शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारा प्रशांत कोरटकर सापडेना,नागपूरमध्येही गुन्हा दाखल
प्रशांत कोराटकर, नागपूर: इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे प्रशांत कोरटकरला चांगलेच महागात पडले आहे. कोल्हापूरनंतर आता प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) विरोधात नागपुरात देखील गुन्हा दाखल झाला आहे..
नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये कोरटकर विरोधात महापुरुषांचा अपमान करणे, सामाजिक तेढ निर्माण करणे या बद्दल गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे… विशेष म्हणजे कोल्हापूरमध्ये आधीच प्रशांत कोरटकरच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरचा शोध घेत आहे…. दरम्यान, कोरटकर अद्यापही फरारच असून नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी बेलतरोडी पोलिस ठाण्याची तीन पथके विविध दिशांना रवाना झाली आहेत.नागपूर पोलिसांच्या सायबर सेल तर्फे प्रशांत कोरटकर सीडीआर आणि लोकेशन प्रमाणे शोध घेतला जात आहे…
चिटफंडमधून 4700 कोटीला गंडा घालणाऱ्या महेश मोतेवारची रोल्स रॉयल्स चक्क प्रशांत कोरटकरकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरडे आलीशान रोल्स रॉईस कार आहे. या कारमध्ये फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ स्वतः प्रशांत कोलटकरने सोशल मीडीयावर शेअर केलेत. पण आश्चर्य म्हणजे प्रशांत कोरटकरकडे असलेली ही रोल्स रॉईस कार चीट फंड घोटाळ्यात हजारो नागरिकांना कोट्यावधींचा गंडा घालणार्या महेश मोतेवारच्या कंपनीच्या मालकीची आहे. महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन फूडस इंडिया लिमिटेड या कंपनीच्या नावावर ही रोल्स रॉईसची नोंद आरटीओमध्ये आहे.
* देशभरातील साडेचार लाख गुंतवणूकदारांना ज्यादा परताव्याचे अमिश दाखवून तब्बल चार हजार सातशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा मोतेवारवर आरोप आहे.
* त्यानंतर देशभरातील 22 वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोतेवारच्या विरोधात 28गुन्हे नोंद झाले.
* त्यानंतर मोतेवारच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आणि त्यांचे लिलाव करण्यात आले. मोतेवारच्या जमीनी आणि वाहनांचा देखील लीलाव करण्यात आला.
* मात्र मोतेवारकडे असलेली रोल्स रॉईस कार प्रशांत कोरटकर चालवत असल्याचे दिसुन आलंय.
* ही रोल्स रॉईस मोतेवारच्या समृद्ध जीवन फुटडस इंडीया लीमीटेड या कंपनीच्याच नावे आहे.
* WB 02 AB0123 असा या गाडीचा नंबर आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.