पंतप्रधानांनी राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

काँग्रेस मुख्यालयात केक कापून वाढदिवस साजरा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी 56 वर्षांचे झाले. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय इंदिरा भवन येथे त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, वरिष्ठ काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते शशी थरूर, मल्लिकार्जुन खर्गे आणि इंडिया ब्लॉकच्या इतर अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर वाढदिवसाचे पोस्टर लावण्यात आले होते. वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी समर्थक आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आवर्जून शुभेच्छा दिल्या आहेत. एका एक्स-पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो.’ असे ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदींचा राहुल गांधी यांना दिलेला हा अभिनंदनाचा संदेश राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन लोकशाही परंपरा आणि परस्पर सलोख्याचे प्रतीक मानले जात आहे.

Comments are closed.