मोठी बातमी : निलेश घायवळ परदेशात पळाला, तुफान पैसा कमावून लंडनमध्ये अलिशान घर बांधलं
पुणे : शैक्षणिक असलेल्या पुण्यात एकीकडे पोलिसांकडून (पोलिस) स्टर्न-फटर गुंडांना गुडघ्यावर आणून त्यांची वरात काढली जात असताना दुसरीकडे कुख्यात गुंड निलेश घायवळ हा लंडना पळून गेल्याची माहिती पोलिस तपासातूनच समोर आली आहे. पुण्यातील कोथरुडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर मॅकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, निलेश घायवळ पुण्यातून (Pune) लंडनला पळून गेल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हत्या, खंडणी, अपहरण, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद असतानाही घायवळला पासपोर्ट मिळाला कसा? हा खरा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान, घायवळने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही, असे याबाबत माहिती देताना पोलिसांनी म्हटले.
कोथरूड गोळीबार प्रकरणात गुंड नीलेश घायवळ याच्यासह 10 जणांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. पोलीस ठाण्यापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर एका तरुणावर केलेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी, आरोपी मयूर गुलाब कुंबरे, राऊत, चदिलकर, फाटक, व्यास यांना अटक करण्यात आली असून, इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. निलेश घायवळने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही, असं पोलिसांनी म्हटलं. तसेच, त्याच्याबाबत ल्यूकआउट नोटीस जारी करण्यात आली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केलं. निलेश घायवळने गुन्हेगारी कृत्यामधुन खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमावला असून त्यातूनच त्याने लंडनमध्ये घर घेतलं आहे. निलेशचा मुलगाही लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं?
कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं? (kothrud ghayawal gang firing)
पुण्यातील कोथरुडमध्ये रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्यांनी दुचाकीला जाण्यास जागा दिली नाही, या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादावादीनंतर तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारात प्रकाश मधुकर धुमाळ (36) रा. थेरगाव हा युवक जखमी झाला. मुठेश्वर मित्र मंडळासमोर 17 सप्टेंबर रोजी रात्री 11.40 मिनिटांनी हा प्रकार घडला. या प्रकरणातील आरोपींनी त्यानंतर जुन्या वादाच्या कारणावरून आणखी एका इसमाच्या मानेवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. या दोन्ही घटनांप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. घायवळ टोळीचा हा म्होरक्या असलेल्या निलेश घायवळ लंडनमध्ये शान के साथ राहात असल्याचं आता तपासातून समोर आलं आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.