कृष्णा, तुझा एन्काऊंटर होणारंय, पोलिसांच्या फोनने तंतरली, आंदेकरचा मुलगा तातडीने पुण्यातील समर्

पुणे : पुणे शहरातील नाना पेठेमध्ये गणेश विसर्जनाच्या एक दिवस आधी आयुष कोमकर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर हा मुख्य आरोपी असून त्याच्यासह इतर 13 जणांना अटक केली गेली आहे. मात्र बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर हा फरार होता. तो आज समर्थ पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला आहे. कृष्णा आंदेकर हजर होण्यामागे एक मोठी माहिती समोर आली आहे.आयुष कोमकर प्रकरणातील तपास अधिकारी असलेल्या शैलेश संखे यांनी त्याला फोन करून एन्काऊंटर करू असं म्हटलं होतं. त्यानंतर फरार असलेला कृष्णा पोलीस ठाण्यात हजर झाला आहे अशी माहिती  समोर आली आहे, याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाईम्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

नेमकं काय घडलं?

नाना पेठ परिसरात ५ सप्टेंबरच्या संध्याकाळी घडलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात अनेक आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आयुष आपल्या भावाला क्लासवरून आणत असताना, पार्किंगमध्येच दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. तब्बल १२ राऊंड फायर करण्यात आले होते, त्यापैकी नऊ गोळ्या आयुष्याच्या अंगावर लागल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर तपासाच्या धाग्यांनी थेट आयुष्याच्या आजोबांपर्यंत पोहोच घेतली. पुण्यातील कुख्यात गुंड आणि गँगस्टर म्हणून ओळखला जाणारा बंडू आंदेकर याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात बंडूसह एकूण १३ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा कृष्णा आंदेकर बराच काळ फरार होता.  दरम्यान, तपास अधिकारी शैलेश संख्ये यांनी कृष्णाला फोनवर “तुझा एन्काऊंटर होईल” अशी धमकी दिल्याचा दावा पुढे आला आहे. याआधी न्यायालयात हजर असताना बंडू आंदेकरनेही पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. “जर कृष्णा पोलिसांसमोर आला नाही तर त्याचा एन्काऊंटर करतील,” असे पोलिस धमकावत असल्याचे त्याने न्यायाधीशांसमोर सांगितले होते. या सर्व घडामोडीनंतर अवघ्या २४ तासांच्या आतच फरार कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. मोक्का न्यायालयाने या सर्वांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आज पोलिस कृष्णा आंदेकरला कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.

आत्मसमर्पण केल्यानंतर, कृष्णा आंदेकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आणि नंतर चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले. त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर केले जाईल. पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रामध्ये खळबळ उडवून देणाऱ्या या हाय-प्रोफाइल प्रकरणात त्यांचे आत्मसमर्पण हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गुन्ह्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात त्यांचा सहभाग असल्याबद्दल आता पोलिस कृष्णाची चौकशी करण्यावर लक्ष केंद्रित करतील.

नेमकं प्रकरण काय?

नाना पेठेत ५ सप्टेंबर रोजी झालेल्या आयुष कोमकर हत्याकांडात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत १२ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि थेट गोळीबार करणारे आरोपी यांचा समावेश आहे. पोलिसांनी ही कारवाई बुलढाणा आणि गुजरातमध्ये केली. गुन्हे शाखेने अटक केलेले शिवराज, शुभम, अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकर यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गुजरातमध्ये धडक कारवाई करून पकडलेल्या या चौघांना न्यायालयाने १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या संपूर्ण हत्याकांडाचा सूत्रधार बंडू आंदेकरचा मुलगा आणि मयत माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा भाऊ कृष्णा आंदेकर असल्याचे समोर आले आहे. त्याच्या सांगण्यावरूनच आयुषची हत्या करण्यात आल्याचा तपासात उलगडा झाला आहे. मात्र, पोलिसांच्या जाळ्यात सर्व आरोपी सापडले असले तरी कृष्णा आंदेकर फरार फरार होता तो आज पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. कोर्टात हजर करण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान बंडू आंदेकरने धक्कादायक दावा केला. “कृष्णाला पोलिसांसमोर हजर कर, नाहीतर त्याला गोळ्या घालू,” अशी धमकीच पोलिसांनी दिल्याचा आरोप त्याने केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.