पतीला मारहाण करत पत्नीचे अपहरण; पुण्यातील धक्कादायक घटना, सैराट चित्रपटासारखं…
गुन्हेगारीच्या बातम्या घाला पुणे: पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला जबर मारहाण करत 28 वर्षीय पत्नीचे अपहरण (Pune Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी येथील हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
सैराट चित्रपटासारखं आंतरजातीय प्रेम विवाहातून मारहाण आणि अपहरण झाल्याचा प्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे. खेड पोलीस स्टेशनमध्ये मुलीचा भाऊ आणि आईसह 15 जणांवर अपहरण आणि जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी 28 वर्षीय असे मारहाण झालेल्या दांपत्याचे नाव आहे.
बीडमधीलही भयावह घटना समोर-
बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत एका शाळकरी मुलीला पाईपने मारहाण करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे . या प्रकरणात तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडमध्ये शाळकरी मुलगी मैत्रिणीसोबत शाळेत जात असताना शुभम बोरखेडे, मधुकर केमकर आणि एका अनोळखी मुलांनी शाळकरी मुलीला बळजबरी उचलून वाहनात बसवले. काही अंतरावर नेत तिचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यातील दोघांनी पीडित मुलीला पाईपने मारहाण केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.