3 दिवसांपासून तरुणी बेपत्ता; सिंहगड किल्ल्याजवळ आढळली बॅग अन् इतर साहित्य, शोधमोहीमेवेळी खोल दर

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या परिसरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह (Pune Crime News) सापडल्याने खळबळ उडाली आहे. हवेली पोलीस स्टेशन, सिंहगड वनविभाग, अग्निशामक दल, हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिकांनी केलेल्या २ दिवसाच्या अथक शोधकार्यानंतर रात्री खोल दरीत बेपत्ता (Pune Crime News) झालेल्या तरूणीचा मृतदेह आढळून आला आहे. मनीषा धर्मदास गायकवाड वय (२८) राहणार धनेगाव, नांदेड सध्या राहणार बिजलीनगर चिंचवड असे मृत तरुणीचे नाव आहे. तरुणीने बुरुजावरून खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.(Pune Crime News)

संबधित तरुणी २८ एप्रिल २०२६ पासून बेपत्ता झाली होती. तिचा मोबाईल, बॅग आणि इतर साहित्य सिंहगड परिसरात आढळून आल्याने कुटुंबीयांनी हवेली पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती. 2 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करत खोल दरीत उतरून मृतदेहापर्यंत पोहोचून मृतदेह शोधण्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आलं. घटनेचा पुढील तपास हवेली पोलीस करत असून नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.(Pune Crime News)

Pune Crime News: नेमकं काय घडलं?

सिंहगड किल्ल्याच्या परिसरातून एक तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. तिची बॅग, मोबाईल आणि इतर साहित्य सिंहगड परिसरात आढळलं होतं. यानंतर कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली. अखेर बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह दोन दिवसांच्या अथक शोधकार्यानंतर खोल दरीत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार तरुणीने बुरुजावरून उडी मारून जीवन संपवल्याचं बोललं जात आहे.

मनीषा धर्मदास गायकवाड (वय २८) असं मृत तरुणीचं नाव असून ती मूळची धनेगाव (जि. नांदेड) येथील रहिवासी होती. सध्या ती पिंचवडमधील बिजलीनगर येथे राहत होती. मनीषा २८ एप्रिल २०२६ पासून बेपत्ता झाली होती. तिची बॅग, मोबाईल आणि इतर साहित्य सिंहगड परिसरात सापडल्याने कुटुंबीयांनी हवेली पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर शोधमोहिम सुरू झाली होती.

तरुणी बेपत्ता झाल्याचे समजताच हवेली पोलीस, सिंहगड वनविभाग, अग्निशामक दल, हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम हाती घेतली. दोन दिवस चाललेल्या या शोधमोहिमेनंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाने दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करत खोल दरीत उतरून मनीषाचा मृतदेह शोधून काढला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.