गर्भलिंग निदान रॅकेटप्रकरणी पुण्यातील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या महिला डॉक्टरला अटक
पुणे : पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटप्रकरणी (Illegal Female Foeticide Racket) पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) एक मोठी कारवाई केली आहे. केडगाव चौफुला येथील प्रसिद्ध ‘पार्थ हॉस्पिटल’च्या (Parth Hospital Kedgaon) संचालिका डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड यांना पोलिसांनी अटक (Doctor Arrested) केली आहे. न्यायालयानं संशयित महिला डॉक्टरला 19 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गर्भात मुलगी असल्याचे समजताच संबंधित महिलांना बेकायदेशीर गर्भपातासाठी (Illegal Abortion) या रुग्णालयात पाठवलं जात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Female Foeticide Shocking Revelation : प्राण्यांच्या सोनोग्राफी मशीनचा महिलांसाठी वापर
यवत (Yavat Police) परिसरात उघडकीस आलेल्या या रॅकेटच्या तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि तोतया डॉक्टर अण्णासाहेब गिरी हा गावोगावी फिरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या (Portable Sonography Machine) साहाय्याने महिलांची बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करत होता.
तपासात निष्पन्न झाले आहे की, गाई-म्हशींसारख्या पशुधनाच्या (Veterinary) आरोग्याची तपासणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा गैरवापर हा महिलांचे गर्भलिंग निदान करण्यासाठी केला जात होता. या तोतया डॉक्टरच्या तपासणीत गर्भात मुलगी असल्याचे स्पष्ट होताच, वो पुढील बेकायदेशीर गर्भपातासाठी महिलांना केडगाव चौफुला येथील डॉ. संगीता गायकवाड यांच्या ‘पार्थ हॉस्पिटल’मध्ये पाठवत असे.
Pune Racket Network Exposed : पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यात साखळी
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटचे जाळे अत्यंत मोठे असून ते पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांपर्यंत पसरलेले आहे. हे आरोपी गावोगावी फिरून गरोदर महिला शोधायचे आणि त्यांची बेकायदेशीर तपासणी करायचे.
Arrested Accused List : या प्रकरणात आतापर्यंत झालेली अटक
अण्णासाहेब गिरी (तोतया डॉक्टर आणि मुख्य सूत्रधार)
नरेंद्र साहेबराव ठाकरे (सहकारी)
डॉ. अतुल अंकुश जाधव (रा. लोहगाव)
डॉ. संगीता पानांडुरंग गायकवाड (संचालिका, पार्थ हॉस्पिटल – नवीन अटक)
या रॅकेटमधील इतर आर्थिक व्यवहार आणि या साखळीत आणखी किती डॉक्टर्स किंवा रुग्णालये सामील आहेत, याचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.
ही बातमी वाचा:
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.