परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक, भिवंडीत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ट्रकसह 1 कोटी 90 ल
भिवंडी क्राईम न्यूज : भिवंडी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यास अटक करण्यात आलं आहे. ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुंबई नाशिक मार्गावरील वडपे गावच्या हद्दीत परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकाला ताब्यात घेवून अटक केली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याकडून 27 लाखांच्या ट्रकसह तब्बल 1 कोटी 90 लाख 35 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हनुमान मोबता राम (२८) ताब्यात घेवून अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.सदर अवैध दारूची वाहतूक ही गोव्याहून राजस्थान मधील उदयपूर राज्यात होणार असल्याचे सापळा कारवाईत उघड झाले आहे.या गुन्ह्याचा तपास गुन्हयाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क भिवंडी विभागाचे निरीक्षक सुभाष एस.खंडेराय हे करत आहेत.
गोदावरी नदीपत्रात बेकायदेशीर रेती उत्खनन प्रकरण, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसह 19 जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.