भाजपने पुण्यात सगळ्यांवरच वरवंटा फिरवला, फक्त अजितदादा नव्हे तर शिंदे गट आणि ठाकरे गटाचाही सुपड
पुणे: राज्यातील काल (शुक्रवारी ता १६) जाहीर झालेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालात त्यांनी भाजपलाच नव्हे तर महायुतीतील मित्रपक्षांनाही जोरदार यश मिळाले आहे. भाजपने (Pune Municipal Corporation Result) जवळपास ९ महापालिकांवरती स्वबळावर सत्ता स्थापन करत येईत इतका आकडा गाठला असून २९ पैकी २४ महापालिकांवर भाजप-शिंदेसेना युतीने वर्चस्व मिळवले आहे. काही ठिकाणी सत्ता (Pune Municipal Corporation Result) स्थापनेसाठी त्यांना मित्रपक्षांची सोबत घ्यावी लागणार आहे. महापालिकांमध्येही भाजप सर्वाधिक जागा मिळवत नंबर एकचा पक्ष ठरला असून जवळपास सर्वच ठिकाणी भाजपच्या जागा मागील वेळेपेक्षा वाढल्या आहेत. (Pune Municipal Corporation Result)
तर शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी, मनसे यांना आपल्या आधीच्या जागा देखील मिळवता आल्या नाहीत. अजित पवार गटाचीही स्थिती काहीशी तशीच आहे. काँग्रेसल्या त्यातल्या त्यात बऱ्या जागा मिळाल्या आहे, पण त्यांचीही कामगिरीही मागील वेळेपेक्षा सुमार राहिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. जेवढे निकाल हाती आले होते, त्यानुसार भाजप महायुती सत्तेपर्यंत पोहचल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येऊनही मुंबईत आपलं स्थान आणि सत्ता मिळवू शकले नाहीत. या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरेंसाठी धक्का मानला जात आहे. तर मुंबईसह पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भाजपने आपले एकहाती वर्चस्व सिद्ध करत दोन्ही राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.(Pune Municipal Corporation Result)
पुण्यात १६५ कोणाला किती जागा मिळाल्या
भाजप ११९
ठाकरे गट १
शिवसेना 0
शरद पवार 3
अजित पवार 27
काँग्रेस १५
मनसे 0
शिवसेना मनसेला मोठ्या धक्का
शिवसेनेसह, मनसेची देखील पुणे महापालिकेतील सुरुवात निराशाजनक राहिली आहे. दोन्ही पक्षांना महापालिकेत साधे खातेही उघडता आलेले नाही. भाजपसोबत युती करून शिवसेना एकत्र लढणार होती. मात्र, जागा वाटपावरून भाजपने अखेरपर्यंत दोन्ही पक्षांचं जमलं नाही. युती होईल, इच्छेप्रमाणे जागा मिळतील या भ्रमात अखेरपर्यंत पक्षाचे स्थानिक नेते चर्चा करत राहिले, मात्र शेवटच्या दिवशी स्वबळाचा नारा दिला. शिवसेनेने ११९ जागांवर उमेदवार उभे केले. मात्र व्यवस्थित नियोजन आणि सभा यांच्या अभावामुळे पक्षाच्या पदरी निराशा आल्याचं चित्र दिसून येत आहे.
शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे, महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मुलगा प्रणव धंगेकर, माजी उपमहापौर आबा बागूल यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. शहरात नेतृत्वाचा अभाव या निवडणुकीच्या पराभवामुळे ठळकपणे दिसून येत असल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन सभा घेतल्या होत्या. पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री उदय सामंत यांचेही लक्ष होते. सोबत विजय शिवतारे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे हेदेखील पुण्यावर लक्ष देऊन होते. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम पुणेकरांवर पडला नाही. आता पक्ष पुन्हा उभारी घेण्यासाठी काय करणार याकडे सर्वांंचं लक्ष लागलं आहे.
पुण्यात फक्त एका जागेवर पेटली मशाल
ठाकरेसेना, काँग्रेस आणि मनसे आघाडीने पहिल्यांदाच एकत्रित पुणे पालिका निवडणुकीला सामोरे गेले आहेत. परंतु, २०१७ मध्ये १० जागा जिंकणाऱ्या ठाकरेसेना यंदाच्या निवडणुकीत केवळ एकच जागा जिंकता त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. एका जागेवर मशाल पेटवल्याचे चित्र आहे. शहरातील प्रभाग क्र. १६ क मध्ये ठाकरेंचे नितीन निवृत्ती गावडे यांनी विजय मिळवून शहरात मशाल पेटती ठेवली आहे.
ठाकरेंचे कल्पना थोरवे, माजी आमदार पुत्र प्रसाद बाबर, रूपेश मोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. प्रमुख उमेदवारांचा पराभव झाल्याने ठाकरेंच्या जागा कमी झाल्या. शिवाय काँग्रेस आणि मनसेसोबत युतीचा फायदा झाला नसल्याचे दिसून आले. तसेच पुण्यात उद्धवसेनेच्या एकाही मोठ्या नेत्याची सभा न झाल्याने त्याचाही फटका ठाकरेसेनेला बसला आहे.
राष्ट्रवादीचे काटे फिरले
भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन पक्ष एकत्र आले. या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच प्रचाराचा दिसत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या पालिकेतील कारभारावर प्रचारा टीका केली होती. अजित पवार यांनी जाहीरनाम्यात मोफत मेट्रो, पीएमपी बस देण्याची घोषणा केली होती. या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “घोषणा करायला तुमच्या बापाचं काय जातं,” आणि मोफत योजनेवरून खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर भाजपने पालिकेच्या तिजोरीत आणा ठेवला नाही. मी बाजीराव आहेच, असे प्रतिउत्तर दिले होते, पण राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या ३० जागा मिळाल्या, त्यामुळे घडळ्याचे काटे उलटे फिरले. हा निकाल अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला बसलेला मोठा धक्का आहे. तर आता पुन्हा नव्या दमानं उतरण्यासाठी आज या पक्षातील मुख्य नेत्यांची बैठक पार पडल्याची माहिती आहे.
आणखी वाचा
Comments are closed.