‘प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका’, आयुष कोमकरच्या आईचा ‘तो’ भावनिक VIDEO समोर, आंदेकर
पुणे: पुण्यात गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यातील नाना पेठ परिसर गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली. कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या टोळीने नातू आयुष कोमकरची हत्या केली. आयुष कोमकर हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा होता. वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने हा खून केला होता. या खुनानंतर पुण्यातील टोळीयुद्ध भडकलं होतं. अशातच आता पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation Election 2025) आंदेकर विरुद्ध कोमकर (Andekar VS Komkar) असा सामना रंगणार असल्याचं दिसून येत आहे. गुंड गणेश कोमकर याची पत्नी कल्याणी कोमकर हिने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुलाखत दिली. प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ आणि नारायण पेठमधून कल्याणी कोमकर निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. १९ तारखेला शिवसेना भवन येथे जाऊन कल्याणी हिने निवडणुकीसाठी सुरू असलेल्या इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली आहे. यावेळी नीलम गोऱ्हे, रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी कल्याणी हिची मुलाखत घेतली, तर कालच कल्याणी हिने आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्यास आत्मदहण करणार असा इशारा दिला आहे.
Ayush Komkar Mother: आयुषच्या आईने व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हटलंय?
आयुष कोमकरच्या आईने याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटलंय की, आंदेकरांना तिकीट दिलं तर मी त्या राजकीय पक्षाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. “सर्वपक्षीय नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे. मला न्याय द्यायचा नसेल तर अन्याय पण करू नका. आंदेकरांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका. कारण त्यांनी माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. सत्तेची ताकद त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ते आज इतक्या थराला पोहोचले. तर प्लिज असं नका करू. त्यांना तिकीट देऊ नका. मी विनंती करते. जो पक्ष त्यांना तिकीट देईल, त्या पक्ष कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेन. माझ्या मुलाला न्याय द्या, मला एवढंच पाहिजे,” असंही कल्याणी कोमकर यांनी म्हटलं आहे.
“अजितदादा आयुष कोमकरला न्याय द्या”, आंदेकरांना तिकीट देऊ नका, अशा मागणी आयुष कोमकरच्या आईची अजित पवारांना पुन्हा हात जोडून विनंती केली आहे. अजित पवारांचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी आंदेकरांना तिकीट देण्याबाबत सुतोवाच केलं होतं. याच पार्श्वभूमीवर आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर यांनी अजित पवारांना हात जोडून विनंती केली आहे.
पुणे महानगरपालिकेसाठी (Pune Municipal Corporation) 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. यंदा पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मुख्य लढत असून भाजप शिवसेना शिंदे गटसह युती करणार आहे.
Pune Mahanagarpalika: पुणे महानगरपलिकेची प्रारूप प्रभागरचना; 41 प्रभाग अन् 165 नगरसेवक
पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे, २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रभागाची संख्या एकने कमी होऊन ४१ करण्यात आली आहे. सदस्यांची संख्या एकने वाढून १६४ वरून १६५ वर पोहोचली आहे. चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. हरकती आणि सूचनांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
फेब्रुवारी २०१७ नंतर आता साडेआठ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. २०११ या वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून प्रभागरचना करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ३४ लाख ८१ हजार ३५९ लोकसंख्येनुसार प्रभागरचना केली आहे. यामध्ये अनुसुचित जातीची लोकसंख्या ४ लाख ६८ हजार, तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४० हजार आहे, या लोकसंख्येच्या आधारे १६५ नगरसेवकांची रचना असेल, चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक असे ४१ प्रभाग निश्चित केले आहेत, असे पालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
प्रभाग ०१ – कळस – धानोरी
प्रभाग ०२ – फुलेनगर – नागपूर चाळ
प्रभाग ०३ – विमाननगर – लोहगाव
प्रभाग ०४ – खराडी – वाघोली
प्रभाग ०५ – कल्याणी नगर – वडगावशेरी
प्रभाग ०६ – येरवडा – गांधीनगर
प्रभाग ०७ – गोखलेनगर – वाकडेवाडी
प्रभाग ०८ – औंध – बोपोडी
प्रभाग ०९ – सुस – बाणेर – पाषाण
प्रभाग १० – बावधन – भुसारी कॉलनी
प्रभाग ११ – रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर
प्रभाग १२ – छ. शिवाजीनगर – मॉडेल कॉलनी
प्रभाग १३ – पुणे स्टेशन – जय जवान नगर
प्रभाग १४ – कोरेगाव पार्क – मुंढवा
प्रभाग १५ – मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी
प्रभाग १६ – हडपसर – सातववाडी
प्रभाग १७ – रामटेकडी – माळवाडी
प्रभाग १८ – वानवडी – साळुंखेविहार
प्रभाग १९ – कोंढवा खुर्द – कौसरबाग
प्रभाग २० – बिबवेवाडी – महेश सोसायटी
प्रभाग २१ – मुकुंदनगर – सॅलसबरी पार्क
प्रभाग 22 – काशेवाडी – डायस प्लॉट
प्रभाग २३ – रविवार पेठ – नाना पेठ
प्रभाग २४ – कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ
प्रभाग २५ – शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई
प्रभाग २६ – गुरुवार पेठ – घोरपडे पेठ
प्रभाग २७ – नवी पेठ – पर्वती
प्रभाग २८ – जनता वसाहत – हिंगणे खुर्द
प्रभाग २९ – डेक्कनजिमखाना – हॅप्पी कॉलनी
प्रभाग ३० – कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी
प्रभाग ३१ – मयूर कॉलनी – कोथरूड
प्रभाग ३२ – वारजे – पॉप्युलर नगर
प्रभाग ३३ – शिवणे – खडकवासला
प्रभाग ३४ – नऱ्हे – वडगाव बुद्रुक
प्रभाग 35 – सनसिटी – माणिक बाग
प्रभाग ३६ – सहकारनगर – पद्मावती
प्रभाग ३७ – धनकवडी – कात्रज डेअरी
प्रभाग ३८ – आंबेगाव – कात्रज
प्रभाग ३९ – अप्पर सुपर इंदिरानगर
प्रभाग ४० – कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी
प्रभाग ४१ – महंमदवाडी – उंड्री
आणखी वाचा
Comments are closed.