पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्वि्स्ट; प्रांजल खेवलकरांच्या तपासाचा अहवाल रुपाली चाकणकरांकडे

पुणे : शहरातील एका फ्लॅटवर झालेल्या पार्टीप्रकरणात माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवळकर अडकले असून त्यांच्यासह साथीदारांना पुणे (पुणे) पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी, अद्याप न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने एकेनाथ खदसननी (एकनाथ खदसे) अधिक बोलणे टाळले आहे. तर, रोहिणी खडसे यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतली. प्रांजल खेवलकर पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे शरद पवार आणि रोहिणी खडसे यांच्यात रेव्ह पार्टी संबंधित चर्चा झाली असणार आहे. याप्रकरणी, आता आणखी नवा ट्विस्ट आला आहे. कारण, राज्य महिला आयोगाने (Rupali chakankar) पोलीस आयुक्तांना पत्र लिहून एका बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं पुण्यातील रेव्ह पार्टीसंदर्भाने तक्रार केली असून त्याच्या तपासाचा अहवाल मागवला आहे.

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केलीय. प्रज्ञा खोसरे यांच्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत प्रांजल खेवलकर यांनी खराडी भागातील ते हॉटेल 28 वेळा बुक करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. खेवलकर यांनी या हॉटेलमध्ये अनेकवेळा मुलींना बोलावल्याचा आरोप देखील करण्यात आला असून हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 28 वेळा रुम बुक करणे हा संगठीत रॅकेटचा भाग असू शकतो, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. त्यासंदर्भाने राज्य महिला आयोगाकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. आता, महिला आयोगाने या अर्जानंतर पुणे पोलीस करत असलेल्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, सोशल मीडियात आणि राजकारणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे पुन्हा एकदा आमने सामने आल्या आहेत. कारण, रोहिणी खडसे यांचे पती आरोपी असलेल्या या खटल्याच्या तपासाचा अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांच्याकडे पाठवला जाईल.

दरम्यान, प्रांजल खेवलकर यांना त्यांच्या चार मित्र आणि दोन महिलांसह शनिवारी पहाटे खरडीत पार्टी करताना अटक करण्यात आली होती. या पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यानुसार, त्यांच्यावर खटला दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

मोठी बातमी! धडाडीचे IAS तुकाराम मुंढेंची बदली, ‘या’ महत्त्वाच्या खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी, 20 वर्षात 23 बदल्यांचा विक्रम

आणखी वाचा

Comments are closed.