सिक्कीम सहलीच्या नावे ज्येष्ठांची फसवणूक, 7 लाखांचा गंडा, ट्रॅव्हल कंपनी बंद करुन मालक फरार

पुणे ट्रॅव्हल कंपनीच्या फसवणुकीच्या बातम्या : पुण्यातील एका ट्रॅव्हल्स कंपनीने सिक्कीम सहलीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे ट्रॅव्हल कंपनी बंद करुन मालक फरार झाला आहे. सिक्कीम सहलीच्या नावे नाशिकमधील अनेक ज्येष्ठ नागरिकांकडून पैसे घेण्यात आले होते. जवळपास 4 लाख रुपयांचा गंडा या पुणे ट्रॅव्हल्स कंपनीने घातला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांनी 14 पर्यटकांकडून 7 लाख 14 हजार रुपये ऑनलाइन घेतले होते

ज्येष्ठ नागरिकांकडून सहलीसाठी पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या पुण्याच्या ट्रॅव्हल संचालकांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अंजना जोशी यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. नोव्हेंबर 2025 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत शंकरनगर गंगापूर रोड येथील ‘भारत्व टुरिझम सर्व्हिसेस’ या कंपनीचे मालक जयदीप काशीकर आणि काजल पवार यांनी सिक्कीमची सहल आयोजित केली होती. यासाठी फिर्यादी जोशी यांच्यासह 13 ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली होती. संशयितांनी 14 पर्यटकांकडून 7 लाख 14 हजार रुपये ऑनलाइन घेतले होते.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर  नागरिकांनी केली पोलिसांत तक्रार

दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये सहल निघणार होती. मात्र, संशयितांनी चालढकल करत आणि वेगवेगळी कारणे सांगत सहलीची वेळ बदलली. 5 महिन्यांचा कालावधी उलटूनही नियोजन होत नसल्याने चौकशी केली असता, ऑफिस बंद असल्याचे आढळले. तसेच फोनवर संपर्क साधला असता तोदेखील बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

आणखी वाचा

Comments are closed.