रायगडच्या आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ कार दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू
रायगडच्या महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात रविवारी रात्री एक भरधाव स्कॉर्पिओ कार 800 फूट खोल दरीत कोसळली. या भयंकर अपघातात स्कॉर्पिओमधील आठही जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व प्रवासी हे आसनगावचे असल्याचे समजते. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून दोन मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहे.
2018 मध्ये याच ठिकाणी एक भीषण अपघात झाला होता. कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची एक बस या दरीत कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला होता.
Comments are closed.