एक रुपया देऊन 10 रुपये, 100 रुपये ओरबाडून काढले जातात, लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंची टीका

मुंबई: राज ठाकरे यांनी मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांना एसआयआर संदर्भातील मेळाव्यात मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी खासदारांची फोडाफाडी, राज्यातील दुष्काळी स्थिती, एसआयर प्रक्रिया यासंदर्भात भाष्य केलं. लाडकी बहीण योजना आणली होती त्यावेळी सांगितलेलं की महिलांच्या सक्षमीकरणाकडे जास्त लक्ष द्या, त्याच्यावर पैसे खर्च करा, दरमहा पैसे देण्याची गरज नाहीये. दीड हजार रुपये देतात ते महिन्याला जातात कुठे ते लक्षात घ्या. आता त्याच्यातही कट येणार , फुकट कोणतीही गोष्ट दिल्यावर राज्य चालू शकत नाही, देश चालू शकत नाही. तुमच्या मतांसाठी ज्यावेळी या फुकट गोष्टी कराव्या लागतात, त्यावेळी बाकीच्या ठिकाणाहून गोष्टी ओरबाडून काढाव्या लागतात, असं राज ठाकरे म्हणाले. तुम्हाला एक रुपया द्यायचा आणि तुमच्याकडून 10 रुपये, 100 रुपये ओरबाडून काढायचे, आपण हे गणित कधी बघणार आहोत की नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे काय म्हणाले?

आज पाऊस पडलेला नाही, दुष्काळी परिस्थिती येणार आहे. पण आपल्याकडे काय सुरू खासदार फोडणे, आमदार फोडणे, नगरसेवक फोडणे. याचा विचार जनतेने केला पाहिजे की ज्यांच्यासाठी तुम्ही मतदान केलं, रांगेत उभं राहून ते असे करत आहेत मग आता तुम्ही काय करणार,  पुढच्या पिढीला काय सांगणार आम्ही विकले गेलो आहे? एक जुने वाक्य आहे, स्वाभिमान मेला ना की जिवंत प्रेत उरते, असं राज ठाकरे म्हणाले.

देशात आत्महत्याचे प्रमाण किती वाढले  आहे. काश्मीर मध्ये 16, मध्यप्रदेश 15 हजार, गुजरात ८ हजार, महाराष्ट्रात 22174 एवढी संख्या सगळ्यात जास्त आहे. नीटचे पेपर फुटत आहेत, जेव्हा आणले नीट तेव्हा विरोध केला होता.

लहान मुलं मुली पळवल्या जात आहेत, खासदार पळवले जात आहेत.  एवढे सगळे सुरू असताना आपल्याकडे काय सुरू आहे तर आपली सत्ता टिकून ठेवायची आहे, म्हणून पैसे टाकले जात आहेत. आज भाजपकडून सुरू आहे, उद्या दुसऱ्या पक्षाकडून सुरू होईल. काल मी बसलो होतो तेव्हा म्हंटल बरेच झाले आपले खासदार निवडून नाही आलेपण यामुळे आपण महाराष्ट्राची परंपरा स्वाभिमान देशाची परंपरा विकत आहोत, असं राज ठाकरे म्हणाले.

एसआयआरमध्ये ममता बॅनर्जी यांची 27 लाख मते उडवली. दिल्लीत केजरीवाल यांना पाडले, बंगालमध्ये ममता बॅनर्जींना पाडले. हवा आहे तो घ्यायचा सुरु आहे. कोण सत्तेत आहे याचे मला घेणे देणे नाही पण ते काय करत आहे याचे फरक पडत आहे. उद्या दुसरे सत्तेत येतील ते ही करतील,आपण काय पायंडे पाडत आहोत, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

Comments are closed.