राजकीय नेत्यांमुळं महाराष्ट्राचं वाटोळं झालं, राज ठाकरेंचा हल्लाबोल
राज ठाकरे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पण आपल्याकडे वाद हिंदी भाषेवरुन चालू आहे. तुम्ही मराठी कडवट होणार नाही तोपर्यंत हे असेच होणार आहे. हिंदी अभिजात भाषा होण्यासाठी आणखी 800 वर्ष लागतील असे मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचे वाटोळे झालं त्याला राजकीय नेते जबाबदार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. भाषेचा अभिमान काय असतो हे बंगला मधील व्हिडिओमध्ये दिसते. यावेळी राज ठाकरे यांनी व्हिडिओ दाखवला. महाराष्ट्रातील माणसाने फक्त मराठीमध्येच बोलावं, समोरचा हिंदीमध्ये बोलू दे असेही राज ठाकरे म्हणाले. पुण्यातील वसंत व्याख्यानमालेनिमित्त आयोजीत कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.
वानखडेवर सचिन येतो ना त्यावेळी मराठी भाषण करतो, मला अभिमान
वानखडेवर सचिन येतो ना त्यावेळी मराठी भाषण करतो. मला अभिमान आहे त्यांचा भारतरत्न आहेत असे राज ठाकरे म्हणाले. आमच्याकडे कवी कोण आणि लेखक कोण हा जातीतून बघितले जाते. मराठी वरुन तुम्ही एकत्र येऊ नये, असा बंदोबस्त केला आहे. रिक्षावाले काही झालं तरी मराठी बोलणारा नाही असे म्हणतात ही हिंमत येते कुठून? हेच तामिळनाडू पश्चिम बंगलला जाऊन हिमंत करु शकता का? असे राज ठाकरे म्हणाले. सी डी देशमुख यांनी महराष्ट्रसाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, पंडित नेहरु यांच्याकडे तो दिला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामुळं त्यांनी राजीनामा दिला. ते आय ए एस होते, त्यांच्याइतके मार्क कुणालाच पडले नाहीत असे राज ठाकरे म्हणाले. हळदीवर पेटन्टसाठी रघुनाथ माशेलकर यांनी अमेरिकेशी भांडण केलं, हे भारताचे आहे सांगून पेंटन्ट घेतले. जेजुरीत भंडारा उधळतो पण आपण माशेलकरांना विसरलो आहे असे राज ठाकरे म्हणाले.
हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावणारा जगताला पहिला माणूस म्हणजे बाळासाहेब ठाकरे
जगाला ओरडून बोंबलून सांगितले पाहिजे की आमच्याकडे कोण जन्माला आले, छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पाहून सांगितले पाहिजे. आपण जाती जातीत महापुरुष विभागले हे आपण केलंय, इतका बेसावध मराठी माणसाइतका भेदरलेलले माणूस या भूतलावर माणूसच नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे प्रचंड महाराष्ट्र्र पुढे गेला. कोयना धरण बांधले. आज महाराष्ट्र्र पुढे गेला तो यशवंराव चव्हाण यांच्यामुळं. हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावणारा जगताला पहिला माणूस म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते. शरद पवार यांच्यासोबत अनेक गोष्टीत वैचारीक मतभेद आहेत, पण महाराष्ट्राला त्याचं योगदान विसरता येणार नाही. सगळ्यात मोठी क्रांती फलउत्पादन क्रांती केल्याचे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील माणसाने फक्त मराठी मध्ये बोला
महाराष्ट्रातील माणसाने फक्त मराठी मध्ये बोलावं, समोरचा हिंदीमध्ये बोलू दे असेही राज ठाकरे म्हणाले. जे व्यक्त करायचं आहे ते मराठी मध्ये करा, समोरचा झक मारत मराठीमध्ये बोलतील असेही ते म्हणाले. जिथे कुठे जाल तिथे मराठीमध्येच बोला असे राज ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
राज्यकर्त्यांचं मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य; मुंबईतील ‘भैय्यांना’ मराठी शिकवणाऱ्यांनाही राज ठाकरेंनी सुनावलं
आणखी वाचा
Comments are closed.