Video मी करतो ते मोकळेपणाने,लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले शिंदे
मराठी: मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपली परखडपणे भूमिका मांडली. राजकारण, भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जवळीक, अशोक खरात प्रकरणावरही त्यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र-माझं व्हिजन या कार्यक्रमात प्रश्नांना उत्तरे दिली. “मी जे काही करतो ते मोकळेपणाने करतो, लपून-छपून काही करत नाही,” असे म्हणत त्यांनी अशोक खरात (अशोक खरात) प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. आमदार दीपक केसरकर आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. कार्यकर्त्यांच्या आग्रहावरुन मी कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. मात्र, प्रत्येकाच्या कपाळावर कॅरेक्टर सर्टिफिकेट लिहिलेलं नसतं, असे शिंदेंनी म्हटलं.
अशोक खरातकडे तुमच्या पुजेसाठी आमदार दीपक केसरकर गेले होते, राधाकृष्ण विखे पाटलांनीही तेच म्हटलंय, असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला होता. त्यावर, मी करतो ते मोकळेपणाने करतो, मी लपून छपून काही करत नाही. मी शिर्डीत गेलो होतो, दोन मंत्री होते, मीडियाही माझ्यासोबत होता. एका कार्यकर्त्याने सांगितले, आता कुणाच्या कपाळावर काय लिहिलेलंय का? आपण काय कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतो का, असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला. तसेच, खरात हा माणुसकीला काळिमा आहे, अशा वृत्तीला थार देणार नाही, ती आमची वृत्ती नाही. खरातला त्याची सजा होणार, असेही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
उद्धव ठाकरेंना भाजपने जवळ घ्यायला तर पाहिजे ना? (Uddhav Thackeray)
भाजप आणि शिवसेना यांच्यात राजकीय शीतयुद्ध किंवा भाजपकडून अडथळे, कोंडी केली जात असल्याच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, “महायुती विजयी घोडदौड करत आहे. कुठे ना कुठे काही होतंच, पण माझा भर सकारात्मक कामावर आहे.” तर उद्धव ठाकरे भाजपजवळ जात असल्याचे विचारले असता, “मला काय फरक पडतो? पण त्यांना जवळ तर घ्यायाला पाहिजे, असे उत्तर एकनाथ शिंदेंनी दिले.
राज्यात सुरू असलेल्या पायभूत सुविधांवर भाष्य करत, 1 मे रोजी मिसिंग लिंक हा ऐतिहासिक प्रकल्प सुरू होत आहे, लोकार्पण होत असल्याचं सांगताना समृद्धी महामार्गाच्या कामातील आठवणी आणि अनुभवही एकनाथ शिंदेंनी सांगितले. राज्यातील मोठ्या प्रकल्पांचा आढावा घेताना शिंदे म्हणाले की, “येणाऱ्या काळात अभियांत्रिकीचा चमत्कार ठरेल असा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प उद्या उद्घाटनासाठी सज्ज आहे. या टनेलमुळे इंधन, वेळ आणि अपघातात मोठी बचत होईल.” घाटातील प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोस्टल रोड, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, तसेच नवी मुंबई विमानतळासारखे प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहेत. “पूर्वी दीड तास लागणारा प्रवास आता 20 मिनिटांत पूर्ण होतो,” असा दावा उपमुख्यमंत्री यांनी केला.
तिसरी मुंबई, आदित्य ठाकरेंचा टोला (आदित्य ठाकरेंवर एकनाथ चमकला)
नवी मुंबई परिसरात ‘तिसरी मुंबई’ विकसित करण्यावर सरकारचा भर असून, मोठ्या शैक्षणिक आणि आरोग्य संस्था उभारल्या जात असल्याचे शिंदे म्हणाले. वाढवण येथे उभारण्यात येणारा बंदर प्रकल्प देशातील क्रमांक एकचा पोर्ट ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बांद्रा-वर्सोवा लिंक, एलिवेटेड रोड, पॉड टॅक्सी यांसारख्या प्रकल्पांमुळे मुंबईतील ट्रॅफिकमध्ये मोठी घट होईल, असा दावा करत त्यांनी “आमचं विकास मॉडेल हे प्रो-एन्व्हायर्नमेंट आहे” असे म्हटले. त्यामुळेच, फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या कमी न होता वाढल्याचे उदाहरण देत त्यांनी नाव नाव न घेता आदित्य ठाकरेंना टोला लगावला.
झोपडपट्टीमुक्त मुंबईचा निर्धार (Mumbai SRA)
मुंबईत “40 लाख लोकांना घर देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट आणि नवीन हाऊसिंग पॉलिसी राबवत आहोत,” असे सांगत त्यांनी सिडको, एमएमआरडीए आणि म्हाडा यांच्या माध्यमातून विविध प्रकल्प एकत्रितपणे राबवले जात असल्याचे स्पष्ट केले. पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि विकास प्रकल्पांच्या जोरावर राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.