‘..आणि मी पक्षप्रवेश करायचा ठरवला’, राजन साळवींनी सांगितलं शिंदे गटात जाण्याचं कारण, म्हणाले, स
सीमा साल्वी: एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंची इमान राखलेल्या मोजक्या आमदारांमध्ये गणल्या जाणाऱ्या राजन साळवींचा (Rajan Salvi) शिंदे गटात पक्षप्रवेश होण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे . आज (13 फेब्रुवारी) गुरुवारी दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत .राजन साळवींच्या पक्षप्रवेशावरून महाराष्ट्रात राजकीय पटलावर एकच चर्चा आहे .दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागे राजन साळवींच कारण काय ? ‘Abp माझा ‘ने विचारल्यानंतर राजन साळवी काय म्हणाले ?पाहूयात .
काय म्हणाले राजन साळवी ?
‘सलग तीन विधानसभा निवडणुकीत मी विजयी झालेला आमदार आहे .2024 च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला .या पराभवाची कारण आहेत .त्यासंबंधी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली .सगळा प्रकार मी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातला .आज मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे .आम्हाला विश्वास आहे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आमच्या मतदारसंघात विकास करेल .याच विश्वासाला माझ्या कार्यकर्त्यांनी ही साथ दिली . उद्धव ठाकरे यांच्यासमोर मी माझ्या भावना व्यक्त केल्यानंतर मी थोडे दिवस शांत होतो .
जिल्ह्याचा विकास करायचा असेल ,मतदार संघाचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे हे मला योग्य वाटले .आणि मी पक्षप्रवेश करायचा ठरवला .माझ्याकडे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यापैकी तीन पर्याय होते .वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत .आमची निशाणी एकनाथ शिंदेंकडे आहे .त्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांची जाणीव झाली की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपण गेलं पाहिजे .एकनाथ शिंदेंचं काम आणि त्यांनी केलेली विकास काम याबद्दल सगळे आमचे कार्यकर्ते समाधानी आहेत .असे राजन साळवी म्हणाले .
…तर राजकीय संन्यास घेईन .
माझ्या पराभवाला जे कारणीभूत आहेत हे सगळं तुमच्यासमोर आलं आहे .मी प्रवेश करेन तेव्हा पत्रकार परिषद घेऊन आणखी सविस्तर सांगेन, असेही साळवी म्हणाले .मी 35 वर्षे शिवसेनेत काम करतोय .मी माझ्या कुलदैवतेला स्मरून सांगतो ,मी जे काम माझ्या मतदारसंघात केलं ते प्रामाणिकपणे केलं .जो आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेल्या सर्व आदेशांचे मी पालन केलं आहे .मी जर काही चुकीचं केलं असं माझे सहकारी म्हणत असतील ..तर माझ्या या कार्यकर्त्यांना विचारा मी कधी शिवसेना विरोधी काम करा असं मी कधी सांगितलं असेल तर मी त्यादिवशी राजकीय संन्यास घेईन.
. दरम्यान , राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतात यात मला फार आश्चर्य वाटलेलं नाही असं सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं .त्यांनाही राजन साळवेंनी प्रतिउत्तर दिल आहे .एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य आहे .निवडणूक असली की जय पराजय घडत असतो .मला असं वाटत नाही उदय सामंतांना शह देण्यासाठी मला घेतलंय .पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे आहेत .आमदार पालकमंत्री यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली .शत प्रतिशत शिवसेना आम्हाला करायची आहे .
https://www.youtube.com/watch?v=_nj6knttcu0
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.