राक्षसाचा जीव पोपटात होता, तसा उद्धव ठाकरेंचा जीव मुंबई महापालिकेत, रामदास कदमांचा हल्लाबोल
उधव ठाकरे वर रामदास कडम: “राक्षसाचा जीव पोपटात होता, तसा उद्धव ठाकरेंचा जीव मुंबई महापालिकेत आहे”, अशी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. दिवा वीजताना जसा फडफडतो तशी उद्धव ठाकरे फडफड सुरू आहे. आज सगळे शिवसैनिक जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेंकडे येत आहेत. शिवसेना भाजपमध्ये मतभेद नाही. एकही आमदार शिवसेनेतून भाजप आणि भाजपमधून शिवसेनेत येणार नाही, असंही रामदास कदम म्हणाले.
रामदास कदम म्हणाले, सामनाचा एक कलमी कार्यक्रम असतो, आम्ही सामनाला कधी ही गांभीर्याने घेत नाही. संपूर्ण महाराष्ट्रही गांभीर्याने घेत नाही. शिवसेनेचे 40 आमदार असताना मुख्यमंत्रिपद शिवसेनेला दिले आता भाजपचे पूर्वीपेक्षा जास्त आमदार आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न करायला काही हरकत नव्हती, पण मला कल्पना नाही प्रयत्न केला की नाही. मला फोन लावून सांगितल की त्यांच्या जास्त जागा आल्या आहे आपण उपमुख्यमंत्रिपद घेऊयात.
पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, काँग्रेस सोबत जाऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले बाळासाहेबांचे विचार सोडले. महाराष्ट्राची जनता काय करते हे दाखवून दिले. 20 आमदार थांबावेत म्हणून हे सगळं सुरु आहे. हा बलिशपण आहे शिवसेना भाजपमध्ये मतभेद कसे होतील ? यासाठी काम संजय राऊत करत आहे. शिवसेना भाजपमध्ये मतभेद निर्माण करुन त्यांना आपली राजकीय पोळी भाजायची आहे. आमची आणि भाजपची युती आहे. आमदारांमध्ये मतभेद आणि चलबिचल निर्माण करुन राजकीय पोळी भाजत आहेत. देवेंद्र फडणवीस, मोदी, शाह यांच्यावर खालच्या पातळीची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हा बुके घेऊन गेले. एकीकडे मोदी- शाह यांच्यावर टीका करतात दुसरीकडे फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमन उधळत आहेत.
हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, अडीच वर्ष किती फंड दिला याचं उत्तर देणार नाहीत. मागच्या अडीच वर्षात प्रचंड पैसा एकनाथ शिंदे यांनी दिला. बाप बेटे खोके खोके करत होते. एकनाथ शिंदे यांना नेस्तनाबूत करायचा विडा उचलला होता ते झाले नाही. एकनाथ शिंदे आमदारांना निधी दिला आमदार निवडून आले, नैतिकता आहे म्हणून एकाही आमदार जाणार नाही, सामनाचा बालिशपणा आहे, असंही रामदास कदम म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=dizjyws5gvg
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.