Ratnagiri News – आंबवली बुद्रुक येथील नागरी वस्तीत बिबट्याचा वावर, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
उंबरशेत आणि रोवले येथे सुरू करण्यात आलेल्या बॉक्साइट उत्खननाच्या खाणींमुळे येथील वनसंपदा पूर्णपणे नष्ट झाली आहे. यामुळे वन्य प्राण्यांच्या अधिवासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दापोलीतील उंबरशेत, रोवले, आतगाव, आंबवली बुद्रुक, माळवी, वांझळोली आदी परिसरातील गावांच्या हद्दीत बिबट्याचा संचार खूपच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आंबवली बुद्रुक गावात एका घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाला आहे.
बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याने गरीब शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बिबट्याच्या संचारामुळे येथील लोकांना शेतात जाण्यासही भिती वाटत आहे. जंगली प्राण्यांचा अधिवासासह त्यांच्या अन्नाचाही भिषण प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बिबट्यासारखे हिंस्र प्राणी भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीकडे घुसत आहेत.
Comments are closed.