Ratnagiri News – जिल्ह्यात पाणीटंचाई; 32 गावातील 78 वाड्यातील 28 हजार ग्रामस्थांना टॅंकरने पाणीपुरवठा
वाढत्या उकाड्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत आहे. सध्या जिल्ह्यात 32 गावातील ७८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू आहे. टंचाईग्रस्त २७ हजार ८३२ ग्रामस्थांना दररोज १५ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
मंडणगड तालुक्यात ३ गावातील ३ वाड्यांमधील २ हजार २४९ ग्रामस्थांना १ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दापोली तालुक्यात १ गावातील १ वाडीतील १४१ ग्रामस्थांना १टॅंकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. खेड तालुक्यात ८ गावातील १५ वाड्यांमधील ९९२ ग्रामस्थांना १ टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. चिपळूण तालुक्यात ८ गावातील १७ वाड्यांमध्ये १ हजार ४२६ ग्रामस्थांना १ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यात ३ गावातील ५ वाड्यांमध्ये ४१५ ग्रामस्थांना एका टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यात ९ गावातील ३७ वाड्यातील २२ हजार ६०९ ग्रामस्थांना १० टॅंकरनी पाणीपुरवठा सुरू आहे.
Comments are closed.