विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे अंबादास दानवे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, उद्धव ठाकरे यांची घोषणा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अंबादास दानवे हे उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतलेला आहे. अंबादास दानवे हे विधानपरिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून अंबादास दानवेजी हे आमचे उमेदवार असतील, अशी माहिती शिवसेना नेते आमदार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली.

आताच्या सगळ्या घडामोडींमध्ये पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. हे आव्हानात्मक आहे. मराठवाड्याच्या मातीतून आलेलो आहे. मराठवाड्याच्या मातीने अनेक आव्हानं स्वीकारलेली आहेत. हे आव्हान मी नक्की स्वीकारेल, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

Comments are closed.