हद्दच झाली! उत्तर प्रदेशातील तरुणाची चिपळुणात गांजाची लागवड!! पोलिसांची छापा टापून धडक कारवाई
अमली पदार्थांविरोधात रत्नागिरी पोलिसांनी मिशन फिनिक्सअंतर्गत कारवाईचा धडाका सुरू ठेवसा आहे. या मोहिमेअंतर्गत चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे पोलिसांनी धडक कारवाई करत 1 लाख 38 हजार 300 रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली. पटेल सॉ मिलच्या आवारात विनापरवाना गांजाची लागवड करून त्याची जोपासना करणाऱ्या उत्तर प्रदेशातील 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने छापा टापून बुधवारी रात्री ही कारवाई केली.
कारवाईत 5 किलो 532 ग्रॅम वजनाची 1 लाख 38 हजार 300 रुपये किंमतीची गाजांची झाडे जप्त केली आहेत. पटेल सॉ मिलच्या कामगारांसाठी आरक्षित खोलीत राहणाऱ्या अभय प्रदीप पांडे (20 रा. अयोध्या, उत्तर प्रदेश) याने गाजांच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांच्या पथकाने केली. या पथकात उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, वैभव मोरे आणि अतुल कांबळे यांचा समावेश होता.
Comments are closed.