RBI : सर्वोदय सहकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई, खराब आर्थिक स्थितीमुळे परवाना रद्द
RBI बातम्या: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अपुरे भांडवल, उत्पन्नाची कमी शक्यता आणि बँकिंग नियामक कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्याचे कारण देत सर्वोदय सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. ही सहकारी बँक आजपासून आपला बँकिंग व्यवसाय बंद करेल. महाराष्ट्र सहकारी आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक यांनाही बँक बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची आणि लिक्विडेटरची (समापक) नियुक्ती करण्याची विनंती करण्यात आली आहे.
बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नव्हती
बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नव्हती, तसेच ती बँकिंग नियमन कायद्यांतर्गत अनेक नियामक आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली होती. बँकेचे कामकाज चालू ठेवणे हे ठेवीदारांच्या आणि सार्वजनिक हितासाठी हानिकारक ठरेल असं आरबीआयने म्हटलं आहे.
आरबीआयने ही कारवाई का केली
आरबीआयच्या मते, बँकेकडे पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाची कमी शक्यता होती, तसेच ती बँकिंग नियामक कायद्यांतर्गत अनेक नियामक आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली होती. आरबीआयने पुढे म्हटले आहे की, बँक चालू ठेवणे हे ठेवीदारांच्या आणि सार्वजनिक हितासाठी हानिकारक ठरेल. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, ती आपल्या विद्यमान ठेवीदारांना पूर्ण परतफेड करण्यास असमर्थ ठरेल. बँकेला आपला बँकिंग व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी देणे हे सार्वजनिक हितासाठी हानिकारक ठरेल, असेही आरबीआयने नमूद केले. परवाना रद्द झाल्यानंतर, बँकेला ठेवी स्वीकारणे आणि परतफेड करणे यासह बँकिंग व्यवसाय करण्यास तात्काळ प्रभावाने मनाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
गुंतागुंतीची आणि वेळखाऊ प्रकिया होणार सुलभ, ग्राहकांसाठी ॲक्सिस बँकेनं घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती
आणखी वाचा
Comments are closed.