माझ्याही मतदारसंघात असाच प्रकार झाला असेल, मतचोरीच्या मुद्यावरुन रोहिणी खडसेंनी व्यक्त केला संश

रोहिणी खडसे: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी महाराष्ट्रासह देशभरात झालेल्या मतचोरीची पोलखोल केली आहे. त्यानंतर देशभरात मतचोरीची चर्चा होत आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाच्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) उपस्थित होत्या. यानंतर त्यांनी ट्वीट करत मतचोरीच्या मुद्याबाबत भाष्य केलं आहे. खडसेंनी ट्वीट करत संशय व्यक्त केलाय.

माझ्याही मतदारसंघात असा प्रकार झाला असेल

माजी आमदार अशोक पवार, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच सचिन दोडके यांनी एका प्रेझेंटेशनद्वारे महाराष्ट्रात कशाप्रकारे मतचोरी झाली यावर प्रकाश टाकला आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या एकाच घर क्रमांकवर 188 मतदार, बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार, आमदारांच्या बायकोचेच दोन मतदान ओळखपत्र, बाजूच्या मतदारसंघातून आयात केलेले मतदार, अशोक बापूंनी मांडलेले हे मुद्दे प्रचंड धक्कादायक होते. यातून माझ्याही मतदारसंघात असा प्रकार झाला असेल असे माझे मत झाल्याचे रोहिणी खडसे म्हणाल्या. आदरणीय शरद पवार साहेब यांनी या विरोधात मोठा लढा देण्याचे ठरवले आहे. या लढ्यात आदरणीय पवार साहेबांसमवेत आम्ही सगळेच खांद्याला खांदा लावून उभे राहू असे खडसे म्हणाल्या.

देशभरात 100 ठिकाणी मतचोरी झाल्याचा राहुल गांधींचा दावा

राहुल गांधी यांनी अशा देशभरात 100 ठिकाणी मतचोरी झाल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 15 जागा कमी मिळाल्या असत्या, तरी मोदी पंतप्रधान झाले नसते आणि इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले असते, असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे. मशीन रीडेबल मतदारयादी आयोग देत नसल्याने संशय बळावल्याचे ते म्हणाले. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी तब्बल एक तास 11 मिनिटे प्रेझेंटेशन करत केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. दोघांनी संगनमत करून मतचोरी करत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी आपल्या प्रेझेंटेशनमधून केला. तुम्ही देशाशी गद्दारी करत आहात, काळ बदलेल तेव्हा तुम्हाला केलेल्या कृत्याची शिक्षा  नक्की मिळेल, असा गर्भित इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.

महाराष्ट्राच्या मतदार यादीतील 40 लाख बनावट नावे, राहुल गांधींचा हल्लाबोल

महाराष्ट्राच्या मतदार यादीतील 40 लाख बनावट नावे रहस्यमय मतदार कुठून आले असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. महाराष्ट्रात काही महिन्यांत लाखो मतदारांची नावे यादीत जोडण्यात आली, जी खूपच चिंताजनक आहे. 40 लाख मतदार गूढ आहेत. पाच महिन्यांत येथे अनेक मतदार जोडले गेले. निवडणूक आयोगाने मतदार यादीबद्दल उत्तर द्यावे. मतदार यादी बरोबर आहे की चूक हे त्यांनी सांगावे असे गांधी म्हणाले होते.

आणखी वाचा

Comments are closed.