अजितदादांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची झालेली रेकी? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, त्या
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात आहे की घातपात आहे, यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात असून त्याबाबच जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार रोहित पवार हे सातत्याने याविषयावर पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित करत आहे, त्याचबरोबर गोळा केलेली माहिती देखील देत आहेत. यापूर्वी त्यांनी तीन पत्रकार परिषद घेतल्या. तर आज चौथ्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी (Rohit Pawar) मोठा गौप्यस्फोट केला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बोलून दाखवलेल्या या गोष्टीमुळे आता पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. रोहित पवारांनी (Rohit Pawar) म्हटलं की अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याठिकाणी काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती. अपघातापूर्वी रेकी झाली होती. या गोष्टीचा सखोल गुन्हेगारी पध्दतीने तपास झाला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.
बारामती विमानतळाची रेकी झालेली?
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी म्हटलं की या गोष्टींचा देखील क्रिमीनल ॲंगलने तपास केला गेला पाहिजे, “काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती. अपघातापूर्वी रेकी झाली होती. याची आम्हाला पक्की माहिती नाही. पण त्या अँगलने चौकशी झाली पाहिजे. याचा सखोल तपास केला गेला पाहिजे अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे.
रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
दावोस दौऱ्यातील विमानाचा प्रवास आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विमान पाडण्याचा इशारा इराण आणि इराकने दिला होता, असा अत्यंत गंभीर खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. डीजीसीए अहवालानंतर रोहित पवारांनी अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
रोहित पवार यांच्या माहितीनुसार, 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान एकनाथ शिंदे साहेब दावोसला गेले होते. आंतरराष्ट्रीय प्रवासात ‘फ्लाईट प्लॅन’ द्यावा लागतो आणि इतर देशांची परवानगी घ्यावी लागते. “बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलही जाऊ शकतं आणि तसच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं”, असा दावा त्यांनी केला आहे.
इराकने सुद्धा हेच केलं
विमानात इंधन (Refueling) भरल्यानंतर ते झुरिकला जात असताना इराणच्या हद्दीतून गेले. इराणने सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू. त्यावेळी या विमानात स्वतः एकनाथ शिंदे आणि इतर काही अधिकारी बसले होते. इराणने हटकल्यानंतर विमान इराकच्या बाजूला गेले, पण इराकने सुद्धा हेच केलं असे ते म्हणाले. शेवटी कोणतीही परवानगी नसल्याने परत ते विमानला आणल गेलं आणि सगळ्या परमिशन तिथे घेतल्या आणि मग झुरिकला तिथे गेलं असे रोहित पवार म्हणाले.
VSR कंपनीचा हलगर्जीपणा आणि पैशांचा हव्यास
या घटनेचा संदर्भ देत पवार म्हणाले, व्हीएसआर (VSR) या कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवू नका कधी काय होईल कधी काय केलं जाईल हे कोणाला सांगता येत नाही. त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला की, कोविडच्या काळात प्रायव्हेट जेटचे तिकीट विकून पेशंट्सकडून भरमसाट पैसे उकळल्यामुळे युएई (UAE) मध्ये त्यांना सहा महिन्यांसाठी बॅन केलं होतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीतही या कंपनीने असा हलगर्जीपणा नाहीतर मुद्दामून गोष्टी केल्या अस आमचं मत असल्याचे ते म्हणाले.
पुरावे नष्ट करण्याचा आणि कागदपत्रे रंगवण्याचा आरोप
रोहित पवार यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, कागदपत्र रंगवली जाऊ शकतात जी रंगवली जात आहेत. तसेच, अपघात आणि पत्रकार परिषदेनंतर ही विमाने महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर काढली जात आहेत. हैदराबादला असलेले ‘लेगसी 600’ हे विमान आता सॅन मारिनो (युएसए) ला ट्रान्सफर करण्यात आले आहे. धंदा सुद्धा शिफ्ट करण्याचं काम तिथं सुरू झालं आहे. जर तुम्ही चोर नसालच घाबरता कशाला पण चोरच घाबरू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती असल्याचा आरोप त्यांनी केला.
आणखी वाचा
Comments are closed.