रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते; पडळकरांचा पलटवार

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवारांच्या समर्थकांनी गोपीचंद पडखळकरांच्या समर्थकाचे अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी, सोलापुरात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून आरोपींना अटकही करण्यात आली आहे. दुसरीकडे हे दोन्ही नेतेही एकमेकांवर टीका टिपण्णी करताना दिसून येतात. सांगलीतील वाळव्यात झालेल्या एका कार्यक्रमात रोहित पवारांनी (Rohit pawar) भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचं कौतुक केलं. तसेच, माजी मंत्री जयंत पाटील यांचेही कौतुक केले. मात्र, गोपीचंद पडखळकरांवर जोरदार हल्लाबोल केला. डुप्लीकेट सोनं, म्हणजेच बेन्टेक्स असा उल्लेख करत त्यांनी पडखळकरांना डिवचलं होतं. आता, आमदार पडखळकरांनी रोहित पवारांवर जोरदार पलटवार केला आहे.

डुप्लिकेटपणा हा पवारांमध्ये ठासून भरलेला आहे, रोहित पवार हा आज्या वरती गेला आहे. आजोबांनी गेली पन्नास वर्ष सोनं म्हणून पितळ विकलं आहे, चिंध्या विकण्याचा धंदा पवारांनी केलेला आहे. रोहित पवारांच्यातही प्रचंड डुप्लिकेट पणा आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. तसेच, रोहित पवारांच्या चुलत्याने कालच त्यांची अब्रू काढली. पोस्टल मतावर निवडून आला आहे, असं अजित पवारांनी भाषणातून सांगितलं. रोहित पवारने माझ्याविषयी काय भाष्य केले, त्यावरती लक्ष देण्याची गरज नाही. मात्र, मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटते. कारण, रोहित पवार हा औरंगजेबासारखा आहे, औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे. औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा घात केला होता, असेही पडळकर यांनी म्हटले. तर, अजित पवार त्यांना पुरून उरणार असल्यामुळेच अजित पवार टिकलेत. मात्र, अजित पवारांच्या पोरांची चिंता मला वाटत. रोहित पवार हा औरंगजेबासारखी कृती अजित पवारांच्या पोरांबरोबर करेल, असा मला डाऊट येतोय, अशा शब्दात पडळखरांनी रोहित पवारांवर तिखट शब्दात पलटवार केलाय.

रोहित पवारांनी स्वत:चा मतदारसंघ शाबूत ठेवावा

मला चिंता करण्याची आवश्यकता नाही, मी पवारांना उलटा पुलटा करून पुरून उरलो आहे. रोहित पवारांची चिंता अजित पवारांनी करणं गरजेच आहे. रोहित पवार सरकारच्या नाकात दम आणतोय अशी कोणतीही परिस्थिती नाही. मीडियामध्ये बातमी लागली म्हणजे तुम्ही शासनाच्या नाकात दम आणला असं होत नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला हा बाळ लोकांच्यात कधी जाणार? गावात गेल्यावर प्रश्न करतात हा गावात जाणार कधी? हा पिगुच्या कोंबडीसारखा आहे. रोहित पवारांनी आपला मतदारसंघ शाबूत ठेवावा, पोस्टल मतावरती निवडून आला हे लक्षात ठेवावं. उद्या तिथून तो निवडून पण येणार नाही. रोहित पवारांच्या विरोधात ठासून पूर्ण क्षमतेने काम करू, महाराष्ट्राचा नेता होण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही स्वतःची आमदारकी घालून बसाल, असेही पडळकर यांनी म्हटले.

हेही वाचा

5 हजार कोटींचा घोटाळा, रोहित पवारांचा गौप्यस्फोट; महायुतीचा आणखी एक मंत्री आमदारांच्या निशाण्यावर

आणखी वाचा

Comments are closed.