कोरटकर सोलापुरकरला जेलमध्ये टाका..’ म्हणताच रोहित पवार नितेश राणेंमध्ये विधानसभेत खडाजंगी

रोहित पवार- नितेश राणे: राज्यात विधानसभेत अबू आझमी (Abu Azmi) यांच्या निलंबनासाठी बुधवारी (5 मार्च) मोठा गदारोळ झाला . औरंगजबाचे गोडवे गाणाऱ्या सपा चे आमदार अबू आझमींचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले.दरम्यान , सोलापूरकर , कोरटकर ते अबू आझमी या मुद्दयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार ) रोहित पवार आणि नितेश राणे विधानसभेत भिडल्याचे दिसले . प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर ला येता 2 दिवसात जेलमध्ये टाकलाच पाहिजे .अशी मागणी रोहित पवारांनी करताच नितेश राणे यांनी कडाडून विरोध करत महाराजांना जाणता राजा म्हणू नका असं कोण म्हणाला असं आपल्या आजोबांना विचारा .आम्हाला शिकवू नका .आपल्या आजोबांना जाऊन शिकवा .आमच्या देवा भाऊंचा सरकार महाराजांचा अपमान करणाऱ्याला सोडणार नाही असं म्हणत विधानसभेत रोहित पवार नितेश राणे यांची खडाजंगी झाली. (Nitesh Rane vs Rahit Pawar)

काय म्हणाले रोहित पवार ?

‘भाषणांमध्ये राष्ट्रपुरुषांचा अपमान होता कामा नये असं राज्यपाल भी भाषणात म्हणाले .हा प्रशांत कोरटकर कोण आहे ?इतका महत्त्वाचा माणूस कसा काय झाला हा ?छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांवर हा माणूस खूप खालचा थराला जाऊन बोलला .त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं .या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून तो मध्य प्रदेशला जातो .मध्यप्रदेशात भाजपचे सरकार इथेही भाजपच .महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून कोरटकर ला अटक का केली नाही असा सवाल रोहित पवारांनी केला .शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं. महामानवांविषयी चूकीचं विधान केल्यावर तुम्ही त्यांना बक्षीस देता .हा पायंडा पडता कामा नये .त्यामुळे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर ला येता 2 दिवसात जेलमध्ये टाकलाच पाहिजे .अशी मागणी करताच नितेश राणे यांनी कडाडून विरोध करत महाराजांना जाणता राजा म्हणू नका असं कोण म्हणाला विचारा यांना असं आपल्या आजोबांना विचारा .आम्हाला शिकवू नका .आपल्या आजोबांना जाऊन शिकवा .मुख्यमंत्री साहेब चौकशी सुरू आहे असे सांगत आहेत . आमच्या देवा भाऊंचा सरकार महाराजांचा अपमान करणाऱ्याला सोडणार नाही, असं म्हणत विधानसभेत रोहित पवार नितेश राणे भिडले .

नितेश राणे काय म्हणाले?

‘मुख्यमंत्री साहेब चौकशी सुरु आहे सांगत आहेत पण महाराजांना जाणता राजा म्हणू नका हे कोण म्हणत बघा… शिवाजी महाराजांबद्दल काय बोलता? राहुल गांधी जयंती दिवशी श्रद्धांजली वाहतात हे जाणता राजा कोणाला म्हणतात आम्हाला तुम्ही शिकवू नका?  महाराजांचा अपमान करणाऱ्याला हे सरकार सोडणार नाही ही आमची भूमिका आहे जाणता राजा म्हणू नका असं कोण म्हणत होत आपल्या आजोबांना विचारा, आपल्या आजोबांना विचारा आम्हाला शिकवू नका… आपल्या आजोबांना जाऊन शिकवा… आम्हाला शिकवू नका… आमच्या देवा भाऊच सरकार महाराजांचा अपमान करणाऱ्याला सोडणार नाही… जाणता राजा म्हणू नका हे हे कोण म्हणत होते…’ असे नितेश राणे म्हणाले.

हेही वाचा:

https://www.youtube.com/watch?v=eltbijuj8mk

अधिक पाहा..

Comments are closed.