फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांवर कारवाई होत नाही; पण, भाजपाला ज्यांचा गेम करायचा त्यांच्यावर सुपर
पुणे जमीन घोटाळा: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्स (Pune Land Scam) एलएलपी कंपनीने तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेलीजमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर (Pune Land Scam) आरोप करण्यात आला, या प्रकरणामुळे राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं.या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी म्हटलंय की, आमचं एकच मत आहे की, कुठलाही नेता असो किंवा त्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती असो, चूक केली असेल तर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
Rohit Pawar on Pune Land Scam: मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला एखाद्या नेत्याचा गेम करायचा असेल तर
तर रोहित पवार पुढे म्हणाले, चूक केली असेल तर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, पण ती कारवाई करताना कुठेही भेदभाव होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. पण हे सरकार आम्ही जेव्हा काही प्रकरणं पुढे आणतो तेव्हा, मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा व्यक्ती असेल तर त्याबाबत कारवाई होत नाही. पण कुठे मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला एखाद्या नेत्याचा गेम करायचा असेल तर त्याच्यावर लगेच कारवाई होते. आम्ही सिडको प्रकरण पुढे आणले. त्याप्रकरणात सरकारच्या एका विभागाने सांगूनही संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही. पण पुणे जमीन घोटाळा प्रकरणात सुपरफास्ट कारवाई केली जाते. आमचं मत आहे, भेदभाव न करता कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिक रोहित पवारांनी स्पष्ट केली आहे.
Rohit Pawar on Pune Land Scam: कोणताही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो
रोहित पवार पुढे म्हणाले जर तुम्ही कुठली गोष्ट अवैध करत असाल, मग तुम्ही सत्तेतल्या नेत्यांच्या नातेवाईक असूद्यात विरोधातील नेत्यांचे नातेवाईक असूद्यात, नाहीतर व्यावसायिक असूदेत किंवा तुमचं सरकार सोबत कुठेही देणं घेणं नाही, जर तुम्ही काही अवैध करत असाल तर तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याबाबतीतली शहानिशा झाली पाहिजे. काय खरं आणि काय खोटं हे लोकांसमोर आलं पाहिजे, पण हे बघत असताना चैन काय आहे, कारण कोणताही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो, त्याला पाठिंबा देणार काही अधिकारी असतात. ते अधिकारी कोण, कशा पद्धतीने ते वागतात, अधिकारी काही लोकांना महत्त्व देतात. काहीच लोकांचे काम तिथं का केली जातात. गरीबाची कामाची तर का होत नाहीत. या सगळ्या गोष्टींची शहानिशा करणार अतिशय महत्त्वाचं आहे. हे सगळं करत असताना आमच्या एकच मत आहे कुठलाही नेता असूद्या किंवा त्याच्या परिवारातील कोणताही व्यक्ती असूद्या चूक केली असेल तर ती चूक समजून योग्य पद्धतीची कारवाई झाली पाहिजे, पण ती कारवाई होत असताना भेदभाव कुठे झाला नाही पाहिजे, याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे, पण या सरकारमध्ये आपण जर पाहिलं तर जेव्हा केव्हा आम्ही काही मुद्दे घेऊन पुढे जात असतो मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या तो व्यक्ती असेल त्याबाबतीत कुठे कारवाई होत नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला एखाद्या नेत्याचा गेम करायचा आहे, त्याच्यावरच लगेच तिथे कारवाई होते. आम्ही सिडकोचं प्रकरण पुढे आणलं होतं, त्याबाबतीत सरकारच्या एका विभागाने सांगून सुद्धा त्या व्यक्तीवर कारवाई केली नाही, पण याबाबतीत तुम्ही पाहिलं तर सुपरफास्ट कारवाई त्यात केली जाते. आमचं म्हणणं आहे, भेदभाव न करता जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे. त्या प्रकारे कारवाई करणे गरजेचे आहे, भेदभाव करू नये, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.
पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मला एकच सांगायचं आहे, ज्या काही सरकारी जमिनी आणि कुळाच्या जमिनी आहेत किंवा इतर काही विषय आहेत ज्या कोणाच्या नावाने जमिनी होत नाहीत, अशा जमिनीचा ताबा ज्या-ज्या लोकांनी घेतलेला आहे, त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी लक्ष घातलेलं आहे त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. आणखी एक गोष्ट ज्या ठिकाणी मुंबईत भाजपने आपलं कार्यालय केला आहे, त्याबाबतीत सुद्धा आपण स्पष्टीकरण दिले पाहिजे. कुठल्याही सरकारची जमीन कुठल्याही पार्टीला किंवा कोणत्याही नेत्याच्या घशात किंवा त्याच्या परिवाराच्या हातामध्ये दिल्या गेल्या नाही पाहिजे, अशी भूमिका आमच्या सर्वांची आहे, असंही रोहित पवार पुढे म्हणालेत.
Rohit Pawar on Pune Land Scam: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून सगळ्यात जास्त जमीन घोटाळे
भाजपाला कुबड्याची गरज संपलेली आहे, अमित शाह यांनी इथे येऊन सांगितलं की, आम्हाला कुबड्यांची गरज नाही. कुठे ना कुठेतरी कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे. काहींची अपेक्षा होती, आदराने कुबड्यांना एखाद्या खोलीमध्ये टांगला जाईल, भिंतीला टांगला जाईल, पण इथे असं दिसतंय की कुबड्या तोडायच्या आणि चुलीत घालायचा भाजपचा प्रय़त्न आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जमीन घोटाळे झालेले आहेत, जर कोणी याला जबाबदार असतील तर ते मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत, करून वोट चोरी, करूया जमिनीची लुटमारी असं या सरकारचा ब्रीदवाक्य झालेलं आहे, या सरकारमध्ये गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन अशा विषयी सरकार राज्यामध्ये आला आहे असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Rohit Pawar on Pune Land Scam: शरद पवारांनी त्या ठिकाणी आपली राजकीय भूमिका व्यक्त केली
भाऊ, आत्या, आजोबा म्हणून आपण एक वेगळी भूमिका त्या व्यक्तीबद्दल घेऊ शकतो. पण एक राजकीय आमदार म्हणून राजकीय विरोधक म्हणून आपली वेगळी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका व्यक्त करताना आपण सहसा बघतो आई असलेल्या महिला असतात त्या थोड्या भावनिक असतात, त्या दृष्टिकोनातून सुप्रिया सुळे यांना अचानक जेव्हा यावर विचारलं तेव्हा त्या भावनिक झाल्या. पण नंतर त्यांनी योग्य राजकीय भूमिका घेतली आणि शरद पवारांनी त्या ठिकाणी आपली राजकीय भूमिका व्यक्त केली. आम्ही शरद पवारांना म्हणणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही त्यांच्या विचाराने काम करणारे लोक आहे असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.