करुणा शर्मांची चाकणकरांविरोधात केंद्रात तक्रार, आता राज्य महिला आयोगाची पहिली प्रतिक्रिया
Rupali Chakankar on Karuna Sharma : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांच्या पोटगी प्रकरणावरिल निकाल गुरुवारी (दि.6) वांद्रे कोर्टाने दिला. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पत्नी करुणा शर्मांना महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी द्यावी, असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या यशानंतर करुणा शर्मा यांनी काल (दि.6) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शर्मा यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले. रुपाली चाकणकर नेत्यांना पाठीशी घालण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसल्या आहेत, अशी टीका करुणा शर्मा यांनी केली होती. शिवाय मी त्यांना पदावरुन हटवण्यासाठी केंद्रीय महिला आयोगाकडे निवदेन दिले आहे, असं शर्मा यांनी म्हटलं होतं. दरम्यान, यावर आज (दि.7) राज्य महिला आयोगाने ट्वीटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. राज्य महिला आयोगाने करुणा शर्मा यांना प्रत्युत्तर देताना 4 ट्वीट केले आहेत. यातून काय काय म्हटलंय जाणून घेऊयात…
राज्य महिला आयोगाचे ट्वीटरवरुन काय काय म्हटलंय?
महाराष्ट्र राज्य महिला आयोगास अर्ध न्यायिक दिवाणी अधिकार आहेत. आयोगास प्राप्त कुठलीही तक्रार आवश्यकतेनुसार समुपदेशन, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला या माध्यमातूनच सोडवली जाते. न्यायप्रविष्ट बाबींमध्ये आयोग दखल देऊ शकत नाही.

अर्जदार श्रीमती करुणा मुंडे यांच्याकडून.. १/४
– महिलांसाठी महाराष्ट्र राज्य आयोग (@maha_mhilaayog) 7 फेब्रुवारी, 2025

२९/०९/२०२२ रोजी आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये संगमनेर पोलीस स्टेशन यांच्यामार्फत सदर प्रकरण आयोगाने निकाली काढले होते. तदनंतर १४/१०/२०२२ रोजी त्यांच्याकडून प्राप्त सविस्तर तक्रारी प्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाणे, बीड पोलीस ठाणे, येरवडा पोलीस ठाणे सायबर पोलिस यांना..

२/४– महिलांसाठी महाराष्ट्र राज्य आयोग (@maha_mhilaayog) 7 फेब्रुवारी, 2025
तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या नंतर १४/०९/२०२३ रोजी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाणे जिल्हा बीड यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सद्यस्थितीत आयोगाकडे श्रीमती करुणा मुंडे यांची तक्रार प्रलंबित नाही. ३/४
तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या नंतर १४/०९/२०२३ रोजी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाणे जिल्हा बीड यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सद्यस्थितीत आयोगाकडे श्रीमती करुणा मुंडे यांची तक्रार प्रलंबित नाही. ३/४
– महिलांसाठी महाराष्ट्र राज्य आयोग (@maha_mhilaayog) 7 फेब्रुवारी, 2025
अर्जदार, गैर अर्जदार तसेच कुठ्ल्याही व्यक्ती यांनी मा. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबाबत चुकीची माहिती, गैरसमज समाजात प्रसृत केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ४/४

इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.