समृद्धी महामार्गवरून प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्यात; पंपावर कर्मचाऱ्याकडून छेड
Samrudhhi Mahamarg बुलढाणा : समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गावर एक धक्कादेणारा कार्यक्रम घडली आहे. यात एका महिलेची समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याने छेड (Molestation) काढण्याची घटना घडली आहे. पुण्यातील (Pune) एका नामांकित कंपनीत कर्मचारी असलेल्या एका महिलेसोबत हा संतापपालक प्रकार घडला आहे.
समृद्धी महामार्ग गुन्हा बुलढाणा : विविध कलमांनुसार गुन्हा डखएल
मिळालेल्या माहितीनुसारही महिला दिवाळीनिमित्त एका खाजगी टॅक्सीने पुण्याहून मध्यप्रदेशातील आपल्या गावाला जात होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील बीबी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर महिला रिफ्रेशमेंटसाठी थांबली असता रात्रीच्या वेळेस पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी या महिलेची छेड काढली. यांनतर महिलेने तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधून मदत मागितली. त्यानुसार बीबी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ पेट्रोल पंपावर दाखल होत पेट्रोल पंपावरील छेड काढणाऱ्या आकाश इंगळे या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलंहे. या प्रकरणी त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. यामुळे मात्र पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.
Chandrapur News : शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. गोंडपिपरी तालुक्यातील चेक पिपरी शेत शिवारातील ही घटना असून भाऊजी पाल असं 70 वर्षीय मृतक शेतकऱ्याचं नाव आहे. भाऊजी पाल हे शेतातील बैल आणण्यासाठी शेतात गेले होते. मात्र संध्याकाळी घरी परत न आल्याने सकाळी त्यांचा शोध घेण्यात आला. तेव्हा त्यांचा वाघाने खाल्लेला छिन्नविच्छिन्न मृतदेह शेतातच आढळून आला. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केलाय. वनविभागाने या भागातील शेतकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे देखील आवाहन केले आहे.
Bhandara : भंडाऱ्याच्या लाखांदुरात कोंबडा बाजारावर पोलिसांचा छापा, आठ जणांना घेतलं ताब्यात
कोंबड्यांच्या पायाला धारदार काती लावून त्यांची दोन वेगवेगळ्या ठिकाणी जीवघेणी झुंज लढवून त्यावर पैशाचा हारजितचा अवैध कोंबडा बाजार सुरू होता. या दोन्ही ठिकाणी भंडाऱ्याच्या लाखांदूर पोलिसांनी छापेमारी करून 7 दुचाकी, कोंबडे, रोख रक्कम असा 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. सर्वांविरोधात लाखांदूर पोलिसात मुंबई जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.