असे राज्य सरकार बुडालेले बरे! राज्यातील भ्रष्टाचारावरून संजय राऊत यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका
राज्य सरकार हे भ्रष्टाचाराचे खाण बनले आहे अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेन्टरसाठी एका मंत्र्यानेच 5 कोटी रुपयांची लाच मागितली असा आरोप केला जात असल्याचे संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले सरकार हे भ्रष्टाचाराची खाण बनले आहे. राज्याची आणि जनतेची लूट खुलेआम सुरू आहे, आपण काय करताय? लहान कामांसाठी देखील मंत्री पैसे मागत आहेत,हे अराजक आहे! लातूर येथील श्री नरसिंग उरगीर मला भेटले, या आधी त्यांची व्यथा घेऊन ते सरकार दरबारी,लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटले पण निकाल शून्य.
केस अशी आहे:
श्री नरसिंग यांनी त्यांच्या आरती सेवाभावी संस्था लातूर यांचे माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेन्टर उदगीर या साठी प्रस्ताव दिनांक 6 / 10 / 2025 रोजी समाज कल्याण मंत्रालयात सादर केला,पंचवीस कोटी रुपयांचा परिपूर्ण असा हा प्रस्ताव. तो प्रस्ताव अद्याप समाज कल्याण मंत्री महोदयांनी मंजूर केला नाही, त्याचे कारण मंत्रीमहोदयानी प्रस्तावाच्या २०% म्हणजेच साधारण पाच कोटीची लाच मुंबईतील ७२ व्या मजल्यावर खासगी घरी बोलवून स्वतः मागितली ,ती रक्कम दिली नसल्यामुळे आपला प्रस्ताव अद्याप मंजूर केला नाही असे श्री नरसिंग यांचे म्हणणे आहे!
अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने पाच कोटी रुपयांची लाच मागितली जाते. ज्या अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात मोठे योगदान आहे! देवेंद्रजी, हा असला दलितोद्धार काय कामाचा? श्री नरसिंग यांची कहाणी राज्यातील प्रत्येक माणसाची व्यथा आहे! असे राज्य सरकार बुडालेले बरे!
(आज नरसिंग उरगिरकर माध्यमाना भेटतील,त्यांना अडवले नाही तर) असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
Comments are closed.