नाशिकमधील ठाकरे गट-मनसेच्या मोर्चाआधीच राऊतांनी फडणवीसांना धारेवर धरलं; म्हणाले, मुख्यमंत्र्यां

देवेंद्र फड्नाविसवरील संजय रौत: आज ‘ठाकरेंची शिवसेना’ (Shiv Sena UBT) आणि ‘मनसे’ (MNS) यांचा नाशिकमध्ये संयुक्त मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी दोन्ही पक्षांमधील बडे नेते थेट मुंबईहून नाशिकला (Nashik) दाखल होत आहे आहेत. वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री, टोळ्यांची दहशत, सोनसाखळी चोरीच्या घटना, आश्वासने देऊन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभार या प्रश्नांवरून महायुती सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाच्या आधीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये शिवसेना सक्रिय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा नाशिकमध्ये जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत असते. नाशिक हे पवित्र धार्मिक स्थान आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. नाशिक श्रीरामाच्या नावाने ओळखले जाते. तसेच नाशिक हे कुसुमाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने देखील ओळखले जाणारे शहर आहे. आज नाशिकमध्ये जी अवस्था आहे, जी परिस्थिती झालेली आहे, त्याच्या विरोधात याआधी देखील आंदोलने झाली आहेत. आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये आम्ही मोर्चा काढत आहोत.

मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांसह फिरावं

नाशिक शहरात लोकांना पाणी नाही. अनेक समस्या आहेत. ड्रग्जची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. हेच नाशिक शहर देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेलं आहे. विकासासाठी त्यांनी यावर उत्तर द्यावे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत नाशिकचा दौरा करावा व तेथील परिस्थिती जाणून घ्यावी, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

संजय राऊतही आंदोलनात सहभागी होणार

संजय राऊत पुढे म्हणाले की, आमच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना वारंवार कळवून झाले आहे. आंदोलने देखील केलेली आहेत. रास्ता रोको केलेले आहेत. पण शेवटी असे ठरले की, नाशिकच्या प्रश्नावर शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन एक विराट मोर्चा काढावा. जन आक्रोश मोर्चा काढावा आणि सरकारचे लक्ष वेधून घ्यावे. मनसेचे अनेक नेते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यात बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर आणि आमचे स्थानिक नेते देखील तिथे उपस्थित आहे. मला देखील या मोर्चाला येण्याचा आग्रह करण्यात आला. कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मी तिथे जात आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=ulk8bp6zju0

आणखी वाचा

Saamana Agralekh On Vice President Election Result: व्होट चोरीतून सी.पी.राधाकृष्णन यांची निवड; विजयानंतरचे बुडबुडे, येथेही घोडेबाजार?, ‘सामना’तून सवाल

आणखी वाचा

Comments are closed.