डिलिमिटेशन बिलासाठी खासदार कमी पडताहेत म्हणून 150 कोटींचा भाव लावलाय, संजय राऊत यांचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केंद्र सरकार पुन्हा एकदा डिलिमिटेशन बील आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी जुळवाजुळव सुरू असून डिलिमिटेशन बिलासाठी खासदार कमी पडत आहेत. देशभरातली खासदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी 150 कोटी रुपयांचा भाव लावण्यात आला आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, डिलिमिटेशन बील मंजूर करण्यासाठी 150 कोटींचा भाव लावला आहे. होलसेलमध्ये खासदारांना आपल्याकडे ओढले जात आहे. संसदेचे अधिवेशन का होत नाही, कारण त्यांना खासदार जमा करायचे आहेत. 150 कोटी रुपयांचा भाव लावण्यात आला असून हा पैसा मुंबईतून जाणार आहे. मुंबई, महाराष्ट्रातील काही प्रमुख राजकीय पुढाऱ्यांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Comments are closed.