‘वेश्या अधिक प्रामाणिक असतात…’; ऑपरेशन टायगरवरून संजय राऊत संतापले; बाळासाहेबांच्या विधानाचा
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) मुळे सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन (Merger) होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संभाव्य बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक आक्रमक ट्विट (Tweet) केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आचार्य दादा धर्माधिकारी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानांचा दाखला देत भारतीय जनता पक्षावर अत्यंत बोचरी टीका केली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्विट करत म्हटले आहे की, “आचार्य दादा धर्माधिकारी यांनी सांगितले होते, पैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते! बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, सध्याचे राजकारण पाहता वेश्या बऱ्या असे म्हणावेसे वाटते! त्या अधिक प्रामाणिक असतात. (महाराष्ट्र अशा राज्याचा गोलपीठा बनवला आहे, इतिहास भाजपला कधीच माफ करणार नाही) जय महाराष्ट्र.” आता संजय राऊत यांच्या ट्विटवर भाजप काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आचार्य दादा धर्माधिकारी यांनी सांगितले होते:
पैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते!
बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते:
सध्याच राजकारण पाहता वेश्या बऱ्या असे म्हणावेसे वाटते!त्या अधिक प्रामाणिक असतात ।
(महाराष्ट्र अशा राज्याचा गोलपीठा बनवला आहे, इतिहास भाजपला कधीच माफ करणार नाही)
विजय…— संजय राऊत (@rautsanjay61) 18 जून 2026
Shivsena Operation Tiger: विलिनीकरणाची घोषणा 21 जूननंतर?
दरम्यान, पडद्यामागे सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या महिनाभरापासून ठाकरे गटाच्या काही खासदारांशी थेट संपर्कात असल्याची माहिती आहे. पक्षांतरबंदी कायद्याचा अडथळा टाळण्यासाठी किमान दोन-तृतीयांश म्हणजेच 6 खासदारांचा गट तयार करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्ली दरबारी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा विलीनीकरणाचा सोहळा 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त होण्याची दाट शक्यता होती. मात्र, काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबी अद्याप शिल्लक असल्याने हा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता असून, आता 21 जूननंतर याची अधिकृत घोषणा होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
Shivsena Operation Tiger: दिल्लीत आज ठाकरे गटाची ‘लिटमस टेस्ट’
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्ष (Speaker) ओम बिर्ला यांना दिल्याचे समजते. मात्र, या खासदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र किंवा फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून आज नवी दिल्लीत सकाळी 11 वाजता संसदीय दलाची (Parliamentary Party Meeting) तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक म्हणजेच खासदारांच्या एकनिष्ठतेची महत्त्वाची कसोटी मानली जात आहे. शिंदे गटासोबत 6 खासदार नसल्याचा ठाम विश्वास ठाकरे गटाला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाकडून सर्व खासदारांना ‘व्हीप’ (Whip) जारी करण्यात आला आहे. आजच्या बैठकीला किती आणि कोणते खासदार उपस्थित राहतात, यावरूनच ठाकरे गटाची पुढील रणनीती निश्चित होणार आहे. 6 पैकी 2 खासदारांनी त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी केलेली नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे हे ‘ऑपरेशन टायगर’ पूर्णपणे यशस्वी ठरले आहे की नाही, याचे चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Comments are closed.