माफी ही पळवाट, बाळासाहेबांचा फोटो फाडताना त्यांच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य होतं; संजय राऊत यांचा घणाघात
कोट्यवधी शिवसैनिकांचे दैवत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शहा सेनेच्या टोळक्याने घोर अपमान केला. शिंदे गटाच्या शायना एनसी यांनी भर पत्रकार परिषदेत शिवसेनाप्रमुखांचा फोटो फाडला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून शायना एनसी यांनी माफी मागितली. मात्र माफी ही पळवाट असून बाळासाहेबांचा फोटो फाडला जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक छद्मी हास्य होते, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केला.
Comments are closed.