देवेंद्र फडणवीसांनी कुदळ-फावडा घेऊन जावं आणि औरंगजेबाची कबर उखडून टाकावी: संजय राऊत
मुंबई: नागपूरमध्ये जी दंगल उसळली त्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहायला हवे. दंगलखोर कुठल्या जातीचा, कुठल्या पक्षाचा, कोणत्या गटाचा हे न पाहता महाराष्ट्रसारख्या राज्यातली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते कठोर पावले उचलावीत. दंगल पेटवणारे कोण आहेत आणि त्यांनी दंगल (Nagpur Riots) का पेटवली, याचा शोध घ्यावा. उद्या गुढीपाडव्यालाही (GudiPadwa 2025) आपलीच लोकं दंगली उसळवण्याचा प्रयत्न करतील, असे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
औरंगजेबाची ढाल करून काही लोक महाराष्ट्रात दंगल माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार तुमचं आहे तर दंगली कशाला भडकवत आहात? सरसंघचालक मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी कुदळ-फावडा घेऊन जावे आणि औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची लोकांची इच्छा पूर्ण करावी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारधारा वेगळी आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं महत्त्व कमी करायचं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने या कारस्थानापासून सावध राहिले पाहिजे. औरंगजेबाजी कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे स्मारक आहे. बाबरी आंदोलन हे वेगळे होते. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका काय होती, हे तुम्ही आम्हाला सांगू नये. मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात बाहेरून येऊन दंगली पेटवल्या जात आहेत. हे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
ही विश्व हिंदू परिषदेची लोक आहेत किंवा संघाची लोक आहेत. त्यांचे चेहरे कळत आहेत. देवेंद्र फडणवीसांना ती लोक माहीत असतील. हिंदूंना भडकविण्यासाठी हिंदूंवर हल्ले केले जात आहेत, हा नवीन पॅटर्न आता सुरू आहे. महाराष्ट्रात हा नवीन दंगल पॅटर्न तयार झालेला आहे. अशा दंगली पेटवून 2029 च्या निवडणुकींना सामोरे जायचं असा हा दंगल पॅटर्न आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं महिमामंडन होणार. औरंगजेबाच्या कबरीचं उदत्तीकरण हे महाराष्ट्रात कोणीही करू नये, तुमचीच माणसं हे करत आहेत. इतिहास मान्य केल्यावर तुमची माणसं जर कुदळ फावडी घेऊन तिकडे गेली असती तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा व मोकोको लावा, ही संघटित गुन्हेगारी आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
सरकारची बदनामी टाळण्यासाठी औरंगजेबाचे प्रकरण उकरुन काढलेय: संजय राऊत
सरकार बदनाम होत आहे. त्यामुळे अधिवेशनात अनेक प्रश्न दाबण्यासाठी हे औरंगजेबाचे प्रकरण बाहेर काढले आहे. जयकुमार रावल यांनी को-ऑपरेटिव बँकेमध्ये आपल्या नातेवाईकांना कोठेवाडी रुपये दिले. गुजरातमधील नातेवाईकांना महाराष्ट्रातील को-ऑपरेटिव्ह बँकेतील पैसे देण्यात आले. हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे. हा एसआयटीच्या अहवालातील आरोपी क्रमांक तीन जयकुमार रावल आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सहीने ती एसआयटी दाबण्यात आली. सहकारी बँकेत असे घोटाळे होतात तेव्हा मुलुंडमधील ना#$ पोपटलाल हा रस्त्यावर येतो. मग जनतेचे 180 कोटी लुटणारे जयकुमार रावल हे मंत्रिमंडळात का? हा प्रश्न त्या मुलुंडच्या ना#$ पोपटलाला किंवा देवेंद्र फडणवीस यांना का पडू नये? फडणवीस यांनी या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. परंतु असे विषय दाबण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण उकरून दंगली भडकवली जात आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
https://www.youtube.com/watch?v=K6frplwbtuk
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.