राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धाव
Shaina NC Meet मराठी: राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आता अवघे तीन तास बाकी आहेत. मात्र अजूनही शिवसेनेचा सस्पेन्स कायम आहे. शिवसेनेनं अजूनही उमेदवारांची नावं जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राज्यसभेच्या एका जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena Shinde Group) ऐनवेळी इच्छुकांची गर्दी (Rajya Sabha Election 2026) पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेत ज्येष्ठ नेत्यांपासून अनेक माजी खासदार इच्छुक असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निर्णय घेण्यात उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्यसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या शायना एनसी देखील इच्छुक आहे. आज सकाळी शायना एनसी पतीसह सचिन तेंडुलकरांचा पुत्र अर्जुन तेंडुलकर यांच्या विवाह सोहळ्याला मुंबईत उपस्थित होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहोचले होते. यावेळी शायना एसनी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. काही सेकंद दोघांमध्ये बोलणं झाल्याचं दिसून आले.
एकनाथ शिंदेंचा ताफा निघताच शायना एनसी पळत सुटल्या- (Shaina NC Meet मराठी)
राज्यसभेच्या तिकिटासाठी लग्नमंडपातून शायना एनसी यांची धावपळ पाहायला मिळाली. शिंदेंचा ताफा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नातून निघताच शायना एनसी एकनाथ शिंदेंच्या गाडी मागे धावताना पाहायला मिळाल्या. शायना एनसी यांनी आधी गाडी थांबवून शिंदेंसोबत संवाद साधला. पण उपमुख्यमंत्र्यांचा दिनक्रम असल्याने ताफा पुढे सरकला आणि त्या ताफ्यामागे शायना एनसीही धावत निघाल्या.
गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळही राज्यसभेसाठी इच्छुक- (Shivsena Rajya Sabha Candidate)
राज्यसभेच्या एका जागेसाठी माजी खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर आणि आनंद अडसूळ हे इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन टर्म खासदार राहिलेल्या गजानन किर्तीकर यांनी यंदा लोकसभेत उमेदवारी न स्विकारता रविंद्र वायकर यांना पाठिंबा दिला. सिटिंग सीट सोडल्याने गजानन किर्तीकर यांनी राज्यसभेसाठी आपला विचार करावा असा प्रस्ताव शिंदेंना दिल्याचे कळते. तर शिवसेना फूट पडल्यानंतर पक्षात शिंदेसोबत आलेल्या माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल हे पद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते शक्य न झाल्याने पक्षाने आता राज्यसभेसाठी विचार करावा अशी गळ अडसूळ यांच्याकडून एकनाथ शिंदेंना घातली गेल्याचे कळते. तर दुसरीकडे नाशिकचे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे आणि कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक यांनीही आज शिंदेंची नंदनवनला भेट घेऊन खासदारकीबाबत इच्छा दर्शवल्याचे समोर आले आहे. (Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate)
राहुल शेवाळे यादीत पहिल्या क्रमांकावर- (Rahul Shewale, Sanjay Nirupam)
काँग्रेसला सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत आलेले माजी खासदार संजय निरुपम सुद्धा पुन्हा दिल्लीत जाण्याची इच्छा व्यक्त केली असून ते सुद्धा विधानसभेत पराभूत झाल्यानंतर राज्यसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे पहिल्यादिवसापासून शिवसेने कार्यरत असलेले शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांचेही नाव या यादीत पहिले आहे. राहुल शेवाळे यांच्यावर दिल्लीतील पक्षाचे नाव आणि चिन्हासंदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईची तर दुसरीकडे मुंबई महापालिकेची जबाबदारी सोपवली होती. दोन्ही जबाबदाऱ्या राहुल शेवाळेंकडून व्यवस्थित हाताळल्या असल्याने त्यातच एकनाथ शिंदेंच्या ते मर्जीतले आहेत. शिवाय तरुण उच्चशिक्षित म्हणून पक्षाची राज्यसभेतील जबाबदारी ते व्यवस्थित हाताळतील हा विश्वास असल्याने राहुल शेवाळे या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. याशिवाय प्रवक्त्या शायना एनसी, आणि प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचीही नावे चर्चेत आहेत. उमेदवारी दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला अनेक इच्छुकांनी मुख्यनेता एकनाथ शिंदेंना नंदनवन या शासकीय बंगल्यावर भेट घेत आपली इच्छा बोलून दाखवली.
राज्यसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून कोणकोण इच्छुक, संपूर्ण यादी- (Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate)
- राहुल शेवाळे
- शायना एनसी
- ज्योती वाघमारे
- संजय निरुपम
- गजानन किर्तीकर
- आनंदराव अडसूळ
- हेमंत गोडसे
- संजय मंडलिक
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.