नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने आगडोंब उसळला, राऊतांचा हल्लाबोल, राष्ट्रवादीच्या गोटातून पहिली प्रत

पुणे: मराठी साहित्य संमेलनात आयोजित केलेल्या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे हे मर्सिडीज घेऊन पदे वाटत असल्याचे सनसनाटी वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यासाठी एकप्रकारे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मविआचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांनाही बोल लावले होते. शरद पवार यांनी नीलम गोऱ्हेंच्या (Neelam Gorhe) वक्तव्यावर व्यक्त झाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या गोटातून काहीशी सावध प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक असणाऱ्या अंकुश काकडे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी अंकुश काकडे यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करणे टाळले. शरद पवार या सगळ्यावर बोलतील, असेही त्यांनी म्हटले. शरद पवार हे यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. गेल्यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचा पुरस्कार देऊन गौरव केल्यानंतर शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. तेव्हादेखील मी स्पष्ट केले होते की, शरद पवार स्वागताध्यक्ष असल्याने साहित्य संमेलनातील कार्यक्रम ठरवणे किंवा त्याठिकाणी बोलवण्यात येणाऱ्या पाहुण्यांशी त्यांचा थेट संबंध येत नाही.

या सगळ्यात संयोजन समितीची भूमिका महत्त्वाची असते. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कोण येणार, कोणाची भाषणं होणार, याची कल्पना स्वागताध्यक्षांना नसते. नीलम गोऱ्हे साहित्य संमेलनात आल्या. त्यांनी राजकीय वक्तव्यं केलं. त्यांच्या या वक्तव्याचा साहित्याशी काहीही संबंध नव्हता. राजकारण आणि साहित्य ही वेगवेगळी क्षेत्रे आहेत, त्यांची गल्लत करु नये, असा संकेत आहे. मात्र, नीलम गोऱ्हे यांनी ती गल्लत केली. त्यासाठी नीलम गोऱ्हे यांचा मी निषेध करतो, असे अंकुश काकडे यांनी म्हटले.

या वादामुळे मविआच्या ऐक्यावर परिणाम होणार नाही: अंकुश काकडे

संजय राऊत यांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. त्यांना जे वाटेल ते बोलून टाकतात. पण तो विषय तेवढ्यापुरता मर्यादित असतो. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याबद्दल संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर आणि स्वागताध्यक्ष शरद पवार निर्णय घेतली. पण संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका तेवढ्यापुरता मर्यादित आहे. साहित्य संमेलनाच्या या वादाचा आणि प्रत्यक्ष राजकारणाचा संबंध नाही. यावरुन महाविकास आघाडीत वाद निर्माण होणार नाही. राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाविकास आघाडीत एकत्र आहेत. या वादामुळे संजय राऊतांचा मविआवर कोणाताही आक्षेप नसावा, असे मत अंकुश काकडे यांनी व्यक्त केले.

नीलम गोऱ्हेंच्या चिखलफेकीची जबाबदारी पवारसाहेब झिडकारु शकत नाहीत, ते सुद्धा तितकेच जबाबदार : संजय राऊत

महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये भरवलं आहे का? कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबे यांनी ठरविले त्यांचे पतीराज हे महाराष्ट्राचे पीडब्ल्यूडी सेक्रेटरी होते ते सगळ्यात भ्रष्ट खाते आहे. शरद पवार साहेबांनी पुढाकार घेतला की नाही हे मला माहित नाही. ते साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. मी आयोजक संजय नाहर यांना काल फोन केला, त्यांनी हात वर केले, ते बोलले आम्ही निषेध केला. उषा तांबे यांनी हे कार्यक्रम ठरवले कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार हा साहित्य महामंडळाचा आहे.  ही राजकीय चिखलफेक झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकरू शकत नाहीत. ते स्वागत अध्यक्ष होते. ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले, राजकीय चिखलफेक झाली, ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. संमेलनाचे अध्यक्ष तारा भवळकर यांनी सुद्धा याच्यावरती पवार साहेबांनी देखील निषेध व्यक्त केला पाहिजे. इतकी राजकीय चिखलफेक होत असताना शरद पवार गप्प कसे राहू शकतात?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.

https://www.youtube.com/watch?v=ukr_cmqggfi

आणखी वाचा

संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स संपताच नाशिकच्या विनायक पांडेंनी सगळंच बाहेर काढलं, म्हणाले, नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून…

अधिक पाहा..

Comments are closed.