शिंदेंच्या सत्कारावरून मविआच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक; कार्यकर्त्यांमध्ये ही टोकाचा संघर्ष
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawawr) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांचे कौतुक आणि सत्कार केल्यानंतर दिवसभर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. दरम्यान या घटनेचे पडसाद कोल्हापुरात (Kolhapur) देखील उमटताना बघायला मिळाले आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला आहे.
शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांनी एखाद्याचं कौतुक केलं म्हणजे ती राजकीय भूमिका नव्हे. त्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडेल असं कोणीही वक्तव्य करू नये. संजय राऊत यांनी केलेली टीका अत्यंत चुकीची असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील शिवसेनेने मांडलेली भूमिका योग्य असून ज्यांनी महाविकास आघाडी फोडली ज्यांनी पक्ष फोडायला मदत केली त्यांचा सत्कार मोठ्या नेत्यांनी करायला नको होता. आमच्या शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी मांडल्या, असं शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.
भाकरी खातात मातोश्रींची आणि चाकरी करतात शरद पवारांची- दादा भुसे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अथक कष्ट करत शून्यातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मार्गक्रमण केलेले आहे. आणि त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाजी शिंदे या पुरस्काराने दिल्ली येथे शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या गोष्टीचा महाराष्ट्राला आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे. परंतु काही लोकांच्या पोटात कायमचा गोळा आहे. एकनाथ शिंदे व आम्ही सर्व एकत्र असतांनाही त्यांच्या पोटात गोळा होता, रोज त्यांची मळमळ बाहेर येते. हे भाकरी खातात मातोश्रींची आणि चाकरी करतात शरद पवारांची. मात्र एकनाथ शिंदे यांचा त्यांनी गौरव केला तर यांच्या पोटात पुन्हा गोळा उठला. यांच्याबद्दल न बोललेले बरे. तू असाच जळत रहा. एवढेच मी बोलेल, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
सत्ताधारी पक्षाच्या जवळीक साधण्याच्या प्रयत्नात शरद पवार असतात- प्रशांत दीक्षित
शरद पवार यांच्या राजकारणाची शैली वेगळी आहे. सत्ताधारी पक्षाच्या जवळीक साधण्याच्या प्रयत्नात शरद पवार असतात. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी जवळीक साधण बऱ्या पैकी सगळ्यांसाठी कठीण आहे. त्यात एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा अनेकदा रंगते आणि त्यांच्याशी सध्या जवळीक साधणं सोप आहे, त्यामुळे हा प्रयत्न असू शकतो. असे मत राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित यांनी व्यक्त केलं आहे.
एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेने शाखा स्थापनेवर भर दिला. आताही एकनाथ शिंदे त्यावर भर देत आहे. मात्र उद्धव ठाकरे हे करताना दिसत नाही. शाखा स्थापनेवर भर न दिल्याने उद्धव ठाकरे यांना विधानसभेत फटका बसला. आता सगळ्या राजकीय खेळी मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर ठेवून खेळल्या जात आहेत, असेही प्रशांत दीक्षित म्हणाले.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.