काय वाट्टेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करू; शरद पवारांचे परखड मत

नाशिक: राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा (Maratha) मुद्दा गाजत असताना दुसरीकडे मराठा समाजाचे Obcization झाल्यास आपल्या आरक्षणावर गदा येईल, या भीतीने ओबीसी (ओबीसी)नेतेही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे, गावागावात ओबीसी आणि मराठा असा सामाजिक समतोल ढासळत चालल्याचे दिसून येत आहे. नांदेडमधील एका संस्थाचालकाने मराठा आरक्षणविरुद्ध याचिका केल्याने, त्यांच्या संस्थेत मराठा समाजातील मुलांना न पाठवण्याचा निर्णय मराठा समाजातील काहींनी घेतल्याचेही वृत्त माध्यमांत झळकले. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रासमोर आज एक मोठं आव्हान आहे. काय वाट्टेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ कसा राहील यासाठी प्रयत्न करू, असे पवार यांनी म्हटले. दिंडोरी (Nashik) येथे शरद पवार यांच्या हस्ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मारकाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी या कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जन्मभूमीत हे स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारक उद्घाटनानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणात दादासाहेब गायकवाड यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याची महती सांगितली. दादासाहेबांच्या 61 ष्टीचा मोठा सोहळा नाशिकमध्या झाला होता, तेव्हा शिरवाडकर, शांताबाई दाणी, दादासाहेब पोतनीस या सर्वानी गायकवाड यांच्या सत्कार केला. त्यानंतर 1968 मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री देऊन दादासाहेब गायकवाड याच सन्मान केला होता, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

वाट्टेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ ठेऊ

आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे आहे, समतेचा विचार अस्थिर होतो का? असे चित्र आहे, सामाजिक ऐक्याची वीण उसवते का असे चित्र आहे? महाराष्ट्रासमोर एक मोठं आव्हान आहे. काय वाट्टेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ कसा राहील यासाठी प्रयत्न करू, असे म्हणत शरद पवारांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र कसे ठेवता येईल, महाराष्ट्राचा लौकिक कसा वाढतात येईल यासाठी काम करू, त्यासाठी आजचा कार्यक्रम महत्वाचा आहे. सामाजिक ऐक्यासाठी हे स्मारक उपयोगी ठरेल, असे म्हणत शरद पवारांनी दादासाहेब गायकवाड यांचा जीवनप्रवास उलगडला.

दादासाहेब गायकवाड यांचा राजकीय जीवनपट उलगडला

खासदार दादासाहेब गायकवाड हे नाव एकेकाळी महाराष्ट्रChastisa कानाकोपऱ्यात खोलवर रुजलेल होते. ज्यांची सुरुवात व्यक्तीगत जीवनात कारकून म्हणून झाली, नंतरच्या काळात हिंदुस्थान अखंड राष्ट्र झाले, त्यानंतर गायकवाड यांची नियुक्ती कराचीमध्ये झाली. पण, त्यांनी कराची सोडले आणि इथे आले. बाबासाहेब आंबेडकर आणि गायकवाड याची भेट झाली, हा गृहस्थ समाजासाठी काम करतो असे त्यांना जाणवले आणि त्याचा सुसंवाद सुरू झाला. त्यातूनच नाशिक जिल्हा परिषदेमध्ये दादासाहेब निवडून आले. स्वतंत्र मजूर पक्षात गायकवाड यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर मजूर पार्टीचे आमदार झाले. मराठी भाषिकांचे राज्य करण्याची आवश्यकता भासली, तेव्हा इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना त्यांनी पत्रव्यवहार केला, आणि मराठी राज्य तयार केले, ज्याचे नेतृत्व चव्हाण साहेबांनी केले, असा इतिहास शरद पवारांनी उलगडला.

नाशिकमधून खासदार बनले

राष्ट्र संकटात आले, चीनशी युद्ध झाले, चीनने आक्रमण केले तेव्हा सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यावेळी संरक्षण खात्याची जबाबदारी व्यवस्थित पाळली गेली नाही, त्यावेळी त्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि राज्याचे नेतृत्व करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांना नेहरुंनी बोलवले, देशाच्या संरक्षणपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यादिवशी यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षणखात्याची शपथ घेतली. 1962 मध्ये दादासाहेब गायकवाड नाशिक लोकबाचे खासदार झाले, यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत जाण्याचे प्रश्न निर्माण झाले, त्यावेळी नाशिक जिल्ह्यातून यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध निवडून दिले, असाही राजकीय इतिहास पवारांनी सांगितला?

युतीचा पाया दादासाहेबांनी रचला

1962 साली दादासाहेब गायकवाड यांना राज्यसभेत येण्याची विनंती केली, राज्याच्या विकासासाठी, समानतेचे राज्य निर्माण करण्यासाठी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची युती झाली. आपण आज वाचतो की देशाच्या सुप्रीम कोर्टाचे नेतृत्व भूषण गवई करतात, त्यांचे वडील रा. सुक? गवई 20 वर्षे लोकप्रतिनिधी होते. त्या ज्या पक्षातून निवडून आले त्या पक्षाच्या युतीचा पाया दादासाहेब गायकवाड यांनी रचला. काळाराम मंदिर प्रवेशाच्या संघर्षामध्ये दादासाहेब गायकवाड यांचा सहभाग होता, असेही पवार यांनी सांगितले?

हेही वाचा

ओबीसी आरक्षणासाठी जीव दिला, भरत कराडच्या कुटुंबीयांना 25 लाख द्या; धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आणखी वाचा

Comments are closed.