शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,
शरद पवार राष्ट्रवादी आणि भाजपची चर्चा संसदेत लोकसभा मतदारसंघाच्या पुर्नरचनेचे विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी भाजपकडून राष्ट्रीय स्तरावर खासदारांच्या आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत(Mahayuti) सत्तेत सामील होऊ शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नुकतीच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत शरद पवार गट सत्तेत आल्यास त्यांना काय मिळणार, याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाची (Congress) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. (Maharashtra Politics news)
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीएमध्ये जायचंय या चर्चा 100 टक्के सुरु आहेत. विचारधारा सोडून तिकडे जायचं की विचारांची कास धरुन आमच्याकडे यायचं हे त्यांनी ठरवावं. ज्यांना आमच्याकडे यायचंय त्यांचं स्वागत आम्ही करतो. शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्याकडून चर्चा होत असल्याचा निरोप आला नाही. आम्ही त्यांच्यासोबत चर्चेला तयार आहोत. मात्र, त्यांच्याकडून अद्याप तसे संकेत आलेले नाहीत, असे काँग्रेसचे नेत विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. यावर आता शरद पवार गटाचे नेते काही प्रतिक्रिया देणार का, हे बघावे लागेल.
NCP Sharad Pawar Camp: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या आमदारांची सविस्तर यादी
जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा)
जयंत पाटील (इस्लामपूर)
रोहित पवार (कर्जत-जामखेड)
रोहित पाटील (तासगाव-कवठेमहांकाळ)
संदीप रवींद्र क्षीरसागर (बीड)
नारायण गोविंदराव पाटील (करमाळा)अभिजीत पाटील (माढा)
खरे राजू ज्ञानू (मोहोळ)
उत्तमराव शिवदास जानकर (माळशिरस)
बापूसाहेब तुकाराम पाठारे (वडगाव शेरी)
राष्ट्रवादीच्या खासदारांची यादीः शरद पवार गटातील लोकसभा खासदार
१. सुप्रिया सुळे – बारामती
२. अमर शरदराव काळे – वर्धा
३. भास्कर भगरे – दिंडोरी
४. सुरेश म्हात्रे – भिवंडी
५. निलेश ज्ञानदेव लंके – अहमदनगर
६. डॉ. अमोल कोल्हे – शिरूर
७. धैर्यशील मोहिते-पाटील – माढा
८. बजरंग सोनवणे – बीड
आणखी वाचा
Comments are closed.