शरद पवारांकडून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांचं कौतुक; सुनेत्रा पवारांनाही सुचवलं?, म्हणाले, दोन
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर शरद पवार राष्ट्रवादीच्या विलिकरनाबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. विलिनीकरणाबाबत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली होती. पण त्याबाबत पुढे कोणताच निर्णय झाला नाही, असं शरद पवार म्हणाले. तसेच बारामतीमध्ये 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार अशा संघर्षावर बोलताना प्रत्येकाने काळजी घ्यावी, असा सल्लाही शरद पवारांनी दिला. शरद पवारांनी काल पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरुन विविध चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांची नाव वगळल्याने मोठी चर्चा होत असताना शरद पवारांनी दोघंचंही कौतुक केलं आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोन्ही क्षमता असणारे नेते आहेत, त्यांच्या क्षमतेचा कसा वापर करावा, हे त्यांच्या आत्ताच्या नेतृत्वाकडे अधिकार आहे, असं म्हणत शरद पवारांनीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना काहीतरी सुचवल्याची चर्चा रंगली आहे. तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल आमच्या सोबत नाहीत. गेले 25 वर्षे माझ्यासोबत होते. सुनील तटकरे जिल्ह्यात नेते आणि राज्याचे अर्थमंत्री होते. त्यांच्यामधे काय कर्तुत्व आहे याची मला कल्पना आहे, असंही शरद पवारांनी सांगितले. (Sunil Tatkare And Praful Patel NCP Politics)
एकदा होते ती टायपिंग मिस्टेक, दोनदा झाली तर तो मेसेज देण्याचा प्रयत्न- (NCP Politics)
सुनेत्रा पवार यांच्या एक्स अकाउंटवरून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदावरून सुरू असलेल्या गोंधळावर पोस्ट करत टायपो मिस्टेक असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु मार्च महिन्यात देखील निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या मिनिट्समध्ये देखील सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदांपुढे काहीच न लिहिल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे एकदा होते ती टायपिंग मिस्टेक दोनदा झाली तर तो मेसेज देण्याचा प्रयत्न आहे, अशी चर्चा सुरू असतानाचा अचानक सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनाच मेसेज देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांच्यावर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची नाराजी आहे. त्यामुळेच काल गुवाहाटीवरून येताना या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत विमानाने न येता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईपर्यंत विमान प्रवास केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या धुरातून लाल दिसतंय, आत काहीतरी मोठं शिजतंय, अशी चर्चा रंगू लागली आहे.
22 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपमधून लढणार-रोहित पवार (Rohit Pawar On Sunil Tatkare And Praful Patel)
22 आमदार घेऊन सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे भाजपमधुनच लढणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे देखील काही आमदार भाजपच्या गळाला लागले आहे, असा दावा रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. मावळचा आमदार (सुनिल शेळके ) भाजपमधूनच लढणार आहेत, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला आहे. तसेच शरद पवारांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरेंना कदाचित सिल्व्हर ओकचा चहा आवडत असेल, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.