शरद पवारांनी घेतली संतोष देशमुखांच्या लेकीच्या शिक्षणाची जबाबदारी; ग्रामस्थांचा आक्रोश

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावी भेट देऊन हत्याकांडातील पीडित संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी, खासदार बजरंग सोनवणे, खासदार निलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक नेतेमंडळीही देशमुख कुटुंबीयांच्या निवासस्थानी पोहोचली होती. शरद पवारांसमोर (Sharad pawar) आपली कैफीयत मांडताना मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना रडू कोसळलं. तर, संतोष देशमुख यांच्या लेकीनेही पवारांसमोर डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी केली. एकंदरीत येथील वातावरण अधिकच भावूक झालं होतं. म्हणूनच, गावकऱ्यांनी शरद पवारांसमोर आक्रोश करताच खासदार बजरंग सोनवणेंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. दरम्यान, शरद पवार यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची मुलगी वैभवी देशमुख हिच्या शिक्षणाची जबाबदीर स्वीकारली आहे. आपल्या भाषणातून त्यांनी याबाबत माहिती दिली.

मस्साजोग गावात शरद पवार यांनी मुलीच्या शिक्षणाची जबबदारी घेणार असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं होतं. तर, ग्रामस्थांनीही संताप व्यक्त करत शरद पवारांसमोरच आक्रोश केला. आम्ही सगळे भयभीत आहोत, उद्या कुणाचा नंबर लागेल याचा नेम राहिला नाही, म्हणून मंत्री धनंजय मुंडेंचां राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. तर, सगळ्या आरोपींना अटक करुन आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिने केली.

सरपंच फक्त भांडण सोडायला गेले होते, यात सुरक्षा रक्षकाची साधी फिर्यादसुद्धा घेतली नाही. काल मुख्यमंत्री म्हणाले की, याप्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार, पण कधी?. तसेच, मुख्य सूत्रधाराला कधी अटक करणार, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला. तर, आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींना टार्गेट केले जाणार आहे. त्यामुळे, या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात करा. याचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे, आता रडून भागणार नाही. खंडणीमध्ये वाल्मिक कराड यांचे नाव टाकले आहे, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं.

वाल्मिक कराडांवर निशाणा

जे घडले त्याने सर्वसामान्य लोकांना धक्का बसला. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणार लोक इथे आहेत, अशा जिल्ह्यात जे घडले ते कुणालाही न पटणारे आहे. सरपंचाची हत्या झाली, जे घडले ज्यात काहीच संबंध नसताना त्यांची हत्या झाली, हे चित्र आतिशय गंभीर आहे. या घटनेची नोंद राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी. या घटनेत आरोपींचा संवाद कुणा-कुणासोबत झाला, हे शोधले पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा हा प्रश्न विधानभवनात मांडला, ते कोणत्या जातीचे आहेत, समाजाचे आहेत हे त्यांनी बघितले नाही, असे म्हणत नाव न घेता शरद पवारांनी थेट वाल्मिक कराडांकडे निशाणा लावल्याचं पाहयल मिळालं.स

वैभवी देशमुखच्या शिक्षणाची जबाबदारी

केंद्र सरकार, राज्य सरकार, सर्व लोक प्रतिनिधी हे या कुटुंबाच्या मागे आहेत. कृपा करा आणि दहशत कमी करण्यासाठी प्रयत्न करा. बीड जिल्ह्यात ही गोष्ट घडली हे आम्हाला न शोभणारे आहे. संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जवाबदारी आम्ही घ्यायला तयार आहेत. आमच्या बारामतीमध्ये 9 हजार मुली शिक्षण घेतात, त्यामध्ये ही एक असेल, असे म्हणत शरद पवारांनी वैभवी देशमुखच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. तसेच, तुम्ही एकटे नाहीत, तुमच्या मागे आम्ही सगळे आहोत. गेलेला माणूस परत आणू शकत नाही, पण आपण धीर देवू शकतो, असेही पवारांनी म्हटले.

हेही वाचा

संतोष देशमुखसारखं काही…; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली

अधिक पाहा..

Comments are closed.