निष्ठेच्या तुफानात सगळे गद्दार वाहून जाणार! संजय राऊत यांचा गद्दार खासदारावर हल्लाबोल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निष्ठावंतांचा भव्य मेळावा शिर्डी येथे सोमवारी पार पडला. या मेळाव्यात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शिर्डीच्या गद्दार खासदाराचा आक्रमक शब्दांत समाचार घेतला. महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी झंझावात दौरा सुरू केलेला आहे. त्यांच्यावर काही लोकांनी आरोप केले. पण उद्धव ठाकरे फिरले नसते तर हा वाघचौरे खासदार झाला नसता आणि आता उद्धव ठाकरे फिरायला लागल्यावर या महाराष्ट्रामध्ये तुफान आलेलं आहे. त्या निष्ठेच्या तुफानामध्ये हे सगळे गद्दार वावटळीसारखे, पाचोळ्यासारखे वाहून गेल्याशिवाय राहणार नाहीत असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी शिर्डी येथील सभेत बोलताना गद्दार खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यावर निशाणा साधला. भाषणाची सुरुवात करतानाच संजय राऊत म्हणाले की, त्या गद्दार खासदाराचे काही वेगळे करू नका, तर तो रस्त्यात कुठेही दिसला की थेट ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करा, हे अत्यंत सोपे आहे. पुढे आपल्या भाषणात एका निष्ठावंत मुस्लिम मावळ्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, त्या मावळ्याने एक फलक लावला आहे, ज्यावर लिहिले आहे की ‘गद्दारांनो, निष्ठा कधीही विकली जात नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंसोबतच राहणार’. ही केवळ त्या एका मावळ्याची भावना नसून संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची हीच भावना आहे. शेवटच्या श्वासापर्यंत, लढाईतल्या शेवटच्या तलवारीच्या घावापर्यंत आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहू असे संजय राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले की, साईबाबांच्या दरबारात आलेलो आहोत इथला खासदार एक नंबरचा बदमाश माणूस होता. एकदा गद्दारी केली, त्याला शिवसैनिकांनी रस्त्यावर तुडवला. परत आला उद्धव ठाकरे यांची, शिर्डीकरांची माफी मागितली आणि आता पुन्हा एकदा शंभर कोटीला विकला गेला. चार दिवसांपूर्वी त्याने बैठकीत साईबाबांची शपथ घेतली. जेव्हा त्याला उद्धव साहेबांनी विचारले, भाऊसाहेब तुमच्याविषयी असे असे ऐकायला येतय महाशय चिडून उठले आणि तीन वेळा साईबाबांची शपथ घेतली. साहेब मी तुमचा निष्ठावंत आहे. माझ्यावर संशय घेऊ नका. मी मरेपर्यंत तुमच्यासोबत राहिन. मग आता कुठे गेला हा मरायला? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला.

हा एक चांगला धंदा सुरू झालेला आहे. पक्षाने खर्च करून, शिवसैनिकांनी मेहनत घेऊन आणि मतं ही उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या लाखो मतदारांनी दिली. हा एक रुपया खर्च न करता खासदार झाला आणि 100 कोटी रुपये फायदा मिळवला. आणि 100 कोटीला विकला गेला. हा ‘धंदा है लेकिन गंदा है’ हे लक्षात घ्या, याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. मात्र, स्वतःचा एक रुपयाही खर्च न करता खासदार झालेल्या या व्यक्तीने 100 कोटी रुपयांना आपली निष्ठा विकल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

पुढे संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे तुम्हाला सांगू इच्छितो की इथल्या शिवसैनिकांनी एक चांगली मोहिम सुरू केलेली आहे. ते गावागावामध्ये भिकेच्या झोळ्या घेऊन फिरत आहेत आणि ते सर्व पैसे त्या खासदाराला देण्याची त्यांची इच्छा आहे. त्याला भिक लागली म्हणून तो गेला. शिवसैनिकांना मी इतकच सांगेन तुमच्यात निष्ठा जोपर्यंत अढळ आहे, अचल आहेत तोपर्यंत असे वाघचौरेसारखे गद्दार येतील आणि जातील, पण आपण सगळे इथे मजबूतीने जेथे आहोत तेथे थांबलेला आहोत.

संजय राऊत म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून शिर्डीवरती जो लोकसभेला आपला भगवा फडकलेला आहे. तो वाघचौरेसारखे लोकं आले आणि गेले म्हणून फडकलेला नाही. आपण आहात, आपल्या निष्ठा आहेत, मेहनत आहे, श्रद्धा आहे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जी अपार श्रद्धा आहे. त्या श्रद्धेतून ही लोकं आमदार, खासदार झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी दौरा सुरू केलेला आहे. त्यांच्यावर काही लोकांनी आरोप केले. मात्र उद्धव ठाकरे फिरले नसते तर हा वाघचौरे खासदार झाला नसता आणि आता उद्धव ठाकरे फिरायला लागल्यावर या महाराष्ट्रामध्ये तुफान आलेलं आहे. त्या तुफानामध्ये हे सगळे गद्दार वावटळीसारखे, पाचोळ्यासारखे वाहून गेल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्याला अजून दोन अडीच वर्ष असून आपल्याला काम केले पाहिजे. वाघचौरेला कधीतरी विचारा की, तू बाबा गेला कशाला, तुला या पक्षाने काय कमी केले? मान सन्मान दिला सर्व काही दिलं तरीही तू गद्दार झालास आता तुला पुन्हा लोकसभेचे तोंड दिसणार नाही. या निश्चयाने आपण इथे उभं राहायला पाहिजे. साईबाबांचा आशीर्वाद हा निष्ठावंताना, हिंदुहदयसम्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. कारण त्यांनी कधीच कोणाचे वाईट केले नाही असे संजय राऊत म्हणाले.

साई तुमच्या दारी आली आहे
काहीतरी करेल
पूर्ण पिशव्या घेऊन जाईल
भगवा ध्वज घेऊन जाईल

या चारोळीने संजय राऊत यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

Comments are closed.