शिव आरोग्य सेनेने केला डॉक्टरांचा सन्मान; 24 रुग्णालयांना दिली स्नेहभेट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेतात. अनेकदा स्वतःच्या विश्रांतीचा विचार न करता ते रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असतात. अशा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन शिव आरोग्य सेनेच्या रायगड जिल्हा शाखेने उरण, पनवेल, करंजाडे, खारघर, बेलापूर आणि नेरुळ परिसरातील सुमारे २४ रुग्णालयांना स्नेहभेट दिली. यावेळी रुग्णालयांचे प्रमुख, डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर आणि उपाध्यक्ष जयवंत गाडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. परेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत अपोलो, मेडिकव्हर, व्हाईट लोटस, मीनाताई ठाकरे यांसह विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांना भेटी देण्यात आल्या. डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शुभेच्छापत्रे देऊन त्यांच्या आरोग्य सेवेतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमात विधानसभा संघटक सुनील पवार, समन्वयक अर्चना क्षीरसागर, मीनल गरुड, विभाग संघटक रोशन शिंदे, तालुका संघटक दिगंबर पाटील, समन्वयक सचिन सावंत आणि सुवर्णा बागुल यांनी सहभाग घेतला.

Comments are closed.