प्रियंका चतुर्वेदींना 2 ओळीही मराठी बोलता येत नाही, ठाकरेंनी त्यांना मराठी शिकवावं : शिवसेना

नरेश महस्के: उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाषण केल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केली. उद्धव ठाकरे हे हारलेले दिसून आले. राज ठाकरे आमच्याबद्दल काही बोलले नाहीत म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. मात्र उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्ही बोलत राहू असे म्हस्के म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी अतिशय गलिच्छ पद्धतीने भाषण करुन उसन अवसान आणल्याची टीका म्हस्के यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची खासदार प्रियंका चतुर्वेदी ( Priyanka Chaturvedi) दोन ओळीही मराठीत बोलू शकत नाही. त्यामुळं उद्धव ठाकरेंना मराठीविषयी बोलण्याचा काय अधिकार?a असा सवालही म्हस्के यांनी केला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रथम आपल्या खासदाराला मराठी शिकवावं, मग मराठीचा पुळका आणावा अशा शब्दात म्हस्केंनी निशाणा साधला.

उध्दव ठाकरे यांनी पालिका निवडणुका तिजोरी डोळ्यासमोर ठेऊन भाषण केल्याचे म्हस्के म्हणाले. महाराष्ट्रमराठी माणसांवर अन्याय असं भडकावून निवडणुका लढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मराठी माणसांना भडकावून त्यांची मते मिळवणे हाच त्यांचा उद्देश होता. तुमची एक हिंदी भाषिक खासदार आहे, प्रियांका चतुर्वेदी त्यांना दोन शब्द मराठीत बोलता येत नाहीत. त्यांना तर बाळासाहेब ठाकरे हे नाव सुद्धा स्पष्ट घेता येत नाही, त्या बालासाहेब म्हणतात असे म्हस्के म्हणाले.

युज अॅन्ड थ्रो असा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव

राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं वाटोळं केलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत नेऊन काय वाटोळं केलं हे सर्वांना माहित आहे. आता त्यांना काँग्रेससोबत राहायचं आहे का? आणि काँग्रेसला यांच्यासोबत राहायचं आहे का? असा सवाल म्हस्के यांनी केला. मी दोन महिन्यांपूर्वी आधीच सांगितलं होत की शिल्लक सेनेत कोणीही राहणार नाही. परवा झालेल्या मेळाव्यात किती आमदार, खासदार उपस्थित होते याचं उत्तर त्यांनी द्यावं. शिवसेनेत एक आदेश असतो तरी सुद्धा कोणी उपस्थित नव्हते. उद्धव ठाकरे हा हरलेला माणूस आहे, उद्या रस्त्यावर जरी ते शिव्या देत फिरले तरी आश्चर्य वाटायला नको असे म्हस्के म्हणाले. युज अॅन्ड थ्रो असा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव असल्याचे म्हस्के म्हणाले.

निशिकांत दुबे यांचा निषेध

एकनाथ शिंदे काय आहे, त्यांची ताकद काय, त्यांच्या मागचा जनाधार त्यांनी दाखवून दिला आहे.  मोठा जनाधार मिळाला आहे. निशिकांत दुबे संदर्भातील वक्तव्य मी ऐकलेलं नाही पण जर ते अशा पद्धतीच वक्तव्य करत असतील तर याचा मी निषेध करतो असे म्हस्के म्हणाले.  निशिकांत दुबे यांनी हे आधी स्पष्ट करावं की त्यांना बिहार सोडून झारखंडला का जावं लागलं. बिहारचे असून देखील झारखंडला का जावं लागलं हे सिद्ध आधी करावं त्यानंतर मराठी माणसाबद्दल बोलावं असे म्हस्के म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.