असे 56 गणेश नाईक.. एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेना नेते संतापले, शीतल म्हात्रेंचा कडक इशारा
मुंबई : महायुतीमधील शिवसेना आणि भाजप नेत्यामध्ये काहीही धुसफूस सातत्याने जाणवते. मात्र, शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर जबरी टीका केली होती. त्यावर, शिवसेनेकडूनही प्रत्त्युत्तर देण्यात आले. मात्र, आता पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी मराठीn (एकनाथ शिंदे) जहरी टीका केल्याने शिवसेना नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येतं. आधी मंत्री संजय शिरसाट, शंभुराज देसाई यांनी गणेश नाईक यांना इशारा दिला होता. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा आमची भूमिका घेणार,आमचा पक्ष सुद्धा तोडीस तोड उत्तर देणार, असे शंभुराज देसाईंनी म्हटलं होतं. आता, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनीही गणेश नाईक यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
राजकारणात कोणीच कोणाला कमी नसते, एखाद्याला संपवायची भाषा केली तर बाकीचे हाताची घडी घालून बसत नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा आमची भूमिका घेणार,आमचा पक्ष सुद्धा तोडीस तोड उत्तर देणार, अशी भूमिका शंभुराज देसाईंनी घेतली होती. तर, शीतल म्हात्रेंनीही जोरदार हल्लाबोल केला. आज दिवंगत नेते आनंद दिघेंच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आम्ही जमलो आहोत, गट स्थापनेसाठी आम्ही उद्या कोकण भवनला जाणार आहोत, अशी माहिती शिवसेना महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली. तसेच, मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरुन जोरदार पलटवार केला.
गणेश नाईक यांना शेवटचे सांगणे आहे, यापुढे जर एकनाथ शिंदेंबाबत एक शब्द जरी काढला तरी महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवेल. या आधी त्यांनी अनेक विंधानं केली, निवडणुकांनंतर अशी विधानं थांबणं अपेक्षित असताना नाईक बेताल वक्तव्य करत आहेत. त्यामुळे, भाजपच्या शिरस्त नेत्यांनी नाईकांना समज द्यावी, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली. गणेश नाईकांना नवी मुंबईशिवाय कोण ओळखतं? स्वतः तीन वेळा पडलेत, मुलं पडलेत, नाईकांनी टिका करताना याचा विचार करावा, असेही त्यांनी म्हटलं. गणेश नाईकांपासून महिला लांब का पळतात, नाईकांवर कुठले गुन्हे आहेत हे बोलायला लावू नका, असा सवालही शीतल म्हात्रेंनी उपस्थित केला. तसेच, शिवसेना आणि एकनाथ शिंदेंचे नामोनिशाण मिटवणारा माई का लाल अजून पैदा झालेला नाही. असे 56 गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे साहेबांचे काही वाकडं करू शकणार नाहीत, अशा शब्दात म्हात्रेंनी पलटवार केला. दरम्यान, मुंबईत महापौर हा महायुतीचाच बसेल, संजय राऊतांना आरामाची गरज आहे, त्यांचं डोकं फिरलंय अशी टीकाही त्यांनी संजय राऊतांवर केली.
हेही वाचा
परभणीत भाजप उमेदवाराचा 1 मताने पराभव, निकालानंतर नवा ट्विस्ट; प्रसाद नांगरेंची हायकोर्टात धाव
आणखी वाचा
Comments are closed.