महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार, आवर घालण्याची गरज; अनिकेत तटकरेंची जहरी टीका महायुतीत भडका
रायगड : जिल्ह्यातील (Raigad) महायुतीमध्ये सुसंगत होत असलेल्या वादाचा भडका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Election) उडताना दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री भरत गोगावलेआमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil tatkare) यांच्यात दोष-आरोप आणि टीका टिपण्णी होत आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही मतभेद बाजूला ठेवून सुनील तटकरेंना दिल्लीला पाठवलं, पण त्यांनी आम्हाला फसवलं, असा हल्लाबोल महेंद्र दळवींनी काही दिवसांपूर्वी केला होता. आता, अनिकेत तटकरे यांनी महेंद्र दळवी हे डोक्यावर पडलेले आमदार आहेत, असे म्हणत काउंटर हल्ला केला आहे. त्यामुळे, महायुतीमध्ये निवडणुकांपूर्वीच भडका उडालाय.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे डोक्यावर पडलेले आमदार आहेत. याशिवाय ते स्वतःला चिटर आमदार असं म्हणणारे असून दुसऱ्यालाही त्याच नजरेने पाहतात, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केली. शिवसेना शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार शाब्दीक दाबा केला होता. त्यानंतर, या टीकेला उत्तर देत अनिकेत तटकरे यांनी आमदार दळवी यांच्यावर बोचरी टीका केली. पार्थ पवार आणि धनंजय मुंडे यांचा घात राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी केला, असा दावा महेंद्र दळवींनी केला होता, या टीकेला अनिकेत तटकरेंनी प्रत्त्युत्तर दिलंय.
आमदार महेंद्र दळवी हे आमच्या नेत्यांवर बेताल वक्तव्य करत असून त्यांच्या या बेताल वक्तव्याला आवर घालण्यासाठी आम्ही त्यांचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार आहोत. याशिवाय महेंद्र दळवी हे स्वतःला मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे समजत आहेत, आता त्यांना आवरण्याची गरज आहे, असेही तटकरे यांनी म्हटले. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी काल रोह्यात शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाला उत्तर देत अनिकेत तटकरे यांनी आमदार दळवी यांना टोला लगावला, तसेच आगामी निवडणुकीत सर्व जागा आम्ही जिंकू, असा दावाही त्यांनी केलाय.
महेंद्र दळवींचा पलटवार
दरम्यान, घोडा मैदान आता जास्त लांब नाही, त्यामुळे येथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असा काउंटर हल्ला महेंद्र दळवींना केलाय. दुसरीकडे मुख्यालयात आमदार असणाऱ्यांना त्यांच्याच होम ग्राउंडवर उमेदवार सापडत नाहीत, त्यांनी आम्हाला आवाहन देऊ नये असा टोलादेखील दळवींना लगावला.
हेही वाचा
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
आणखी वाचा
Comments are closed.