मराठी बोलून राज्यात 15 लाख 70 हजार कोटींचे प्रकल्प आणलेत; उदय सामंतांकडून मराठीची बोलू कौतुके!

ठाणे : मराठी भाषा बोलताना लाजण्याची काही आवश्यकता नाही, मराठी भाषा मी स्वतः बोलतो. मी जेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत गेलो होतो तेव्हा मराठी बोलत असतांना देखील 15 लाख 70 हजार कोटींचे प्रकल्प आले. याचा अर्थ मराठी भाषा हि जगामध्ये प्रसिद्ध आहे, जगामध्ये बोलली जाते. आपण देखील मराठीचा वापर केला पाहिजे अशी भावना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती काय होती, त्यांचं व्यक्तिमत्व काय होतं, त्यांनी आपल्या शत्रूंवर कशाप्रकारे मात केली हे शिक्षण जेएनयुमधून (JNU) मिळावं, यासाठी एकनाथ शिंदेसाहेब (मराठी) मुख्यमंत्री असताना दहा कोटी त्यांनी जेएनयुला दिलेले आहेत. तसेच प्राकृत भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, प्राकृत भाषा देखील महाराष्ट्रात होती, त्यामुळे त्याला काही निधी महाराष्ट्राला मिळावा हि आमची मागणी असल्याचे ही महाराष्ट्र राज्याचे मंत्री उदय सामंत (Uday samant) म्हणाले.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलतील

दरम्यान, कर्नाटक एसटी वादामध्ये आमच्या सर्वांची भूमिका हीच आहे कि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलतील, केंद्र सरकारशी बोलतील आणि यातून पूर्ण मार्ग काढतील अशी खात्री असल्याचा विश्वास मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केलाय. तर अमोल कोल्हे हे निर्माते होते, ते त्यातले कलाकार होते, तशी त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली असल्याचे ही ते म्हणाले. दरम्यान मराठी शाळा दर्जा विषयी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, शालेय शिक्षण विभागांमधून देखील दर्जेदार शाळा उभ्या रहाव्यात, यासाठी मंत्री दादासाहेब भुसे प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यावर अभ्यास करत आहेत. त्याहून पण चांगल्या शाळा उभ्या राहतील अशी मला खात्री आहे.

विजय वडेट्टीवरांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो- उदय सामंत

ज्या मतदारसंघातून मी निवडून येतो त्याच मतदारसंघात नाणीजला जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र महाराजांचा मठ आहे. तिथे अनेक लाखो भाविक भक्त येतात. त्यांनी ज्या वेळेला त्यांची भूमिका मांडली, वडेट्टीवर यांनी त्यांना एकेरी उल्लेख करून कमी लेखण्याचा प्रयत्न केला. त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. वडेट्टीवार हे देखील राजकारणात आहेत. आज महाराष्ट्राच्या संतप्त भावना मांडल्या जात आहेत. त्याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे असेही उदय सामंत म्हणाले.

….तर ठाणेकर सगळे मनसुबे उधळून लावतील- उदय सामंत

संजय राऊत असतील किंवा इतर कोणीही लोकशाहीमध्ये कुठेही जाऊ शकतात. अनेक वेळेला ठाणे दौऱ्याला अनेक लोक आली, पण एकनाथ शिंदे साहेब सव्वा लाख मतांनी निवडून आले आहेत.त्यामुळे ठाण्यात कोणी जरी आलं तरी एकनाथ शिंदे साहेबांच्या राजकीय नेतृत्वाला डॅमेज करू शकतील असे जर त्यांचे मनसुबे असेल तर ते ठाणेकर उधळून लावतील. म्हणूनच ठाण्यामध्ये जो काय रिझल्ट मिळालाय त्यात सगळं आलंय, असेही उदय सामंत  म्हणाले. साहित्य संमेलनात राजकारण येऊ नये, या मताचे आम्ही आहोत, परंतु राजकीय गोष्टींची चर्चा जेव्हा एखाद्या व्यासपीठावर होते आणि एखाद्या विचारलेल्या प्रश्नावर दिलेलं ते उत्तर होतं. याबाबतीत ज्या काही चर्चा होत आहेत, तर साहित्य संमेलन आता संपलेलं आहे. संमेलनानंतर स्वागत अध्यक्ष शरद पवार साहेबांनी देखील त्यांची भूमिका मांडलेली आहे.  मुलाखतीच्या चर्चेमध्ये हे झालंय, चर्चात झाली नसती तर अशी उत्तर देखील मिळाली नसती. असेही ते म्हणाले.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.