श्री चरणीने रचला इतिहास; आयसीसी क्रमवारीत सर्वाधिक गुण मिळवणारी हिंदुस्थानी खेळाडू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आशिया कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीत लक्षणीय प्रगती केली आहे. फिरकी गोलंदाज श्री चरणीने जगातील अव्वल गोलंदाज म्हणून आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. यासह ती महिलांच्या क्रमवारीत सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारी हिंदुस्थानी खेळाडू ठरली आहे. तिने 2011 मध्ये फलंदाजी क्रमवारीत 780 रेटिंग गुण मिळवणाऱ्या माजी कर्णधार मिताली राजला मागे टाकले आहे. श्री चरणीच्या खात्यात 804 रेटिंग गुण आहेत.

श्री चरणी आता आयसीसी महिला टी-20 क्रमवारीत सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारी गोलंदाज बनू शकते. आशियाई खेळांदरम्यान तिला हा पराक्रम करण्याची संधी मिळेल. त्याआधी 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या हिंदुस्थान-जपान सामन्यात चांगली कामगिरी करून ती एक विशेष कामगिरी करू शकते. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मेगन शटने 806 रेटिंग गुण मिळवले होते. ती आयसीसी महिला क्रमवारीत सर्वाधिक गुण मिळवणारी गोलंदाज आहे.

आशिया कपमध्ये शक्तिशाली कामगिरी

श्री चरणीने आशिया कपमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि हिंदुस्थानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने पाच सामन्यांमध्ये केवळ 3.66 च्या इकॉनॉमी रेटने 12 विकेट्स घेतले. अंतिम सामन्यात तिने श्रीलंकेविरुद्ध चार षटकांत 20 धावा देऊन 4 फलंदाजांना बादही करत विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

दीप्ती शर्मलाही फायदा

दीप्ती शर्मानेही आयसीसी महिला टी-20 गोलंदाजी क्रमवारीत चार स्थानांची झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे. दीप्तीने आशिया कपमध्ये सर्वाधिक 14 बळी घेतले. वेगवान गोलंदाज नंदनी शर्मानेही दहा स्थानांची झेप घेत 94 वे स्थान पटकावले आहे. लेग-स्पिनर प्रेमा रावत 50 स्थानांनी पुढे जात 96 व्या स्थानावर पोहोचली आहे. महिलांच्या टी-20 फलंदाजी क्रमवारीत शफाली वर्माने एका स्थानाची झेप घेत सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

Comments are closed.